एक्स्प्लोर

डिझेल चोरीचा भांडाफोड, रेल्वेच्या ठेकेदारासह एकाला ठोकल्या बेड्या

Western Railway : रेल्वेचे डिझेल चोरी करून ते विकणाऱ्या एका ठेकेदाराला आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींजवळ डिझेलने भरलेले चार ड्रम मिळाले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत.

मुंबई : अंधेरी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) डिझेल चोरीचा भांडोफोड केलाय. रेल्वेचे डिझेल चोरी करून ते विकणाऱ्या एका ठेकेदाराला आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींजवळ डिझेलने भरलेले चार ड्रम मिळाले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. मोहम्मद इस्माईल शेख आणि संतोष पांडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून यातील शेख हा जेसीबी ऑपरेटर असून पांडे हा ठेकेदार आहे.  

अंधेरी आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेला ठेकेदार पांडे हा गेल्या पाच वर्षांपासून रेल्वेसाठी ठेकेदारी करतो. त्याला पश्चिम रेल्वेकडून बोरीवली पासून चर्चगेटपर्यंतच्या 72 पंपिंग मशिनमध्ये डिझेल भरण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पावसाळ्यात या सर्व 72 पंपिंग मशिन्सवर डिझेल भरण्याचे काम पांडेकडे सोपविण्यात आले होते.  करारानुसार रेल्वेकडून डिझेलचा पुरवठा करण्यात आला होता. पांडे याला रेल्वेकडून 3000 लिटर डिझेल देण्यात आले होते. पाऊस संपल्यानंतर पांडे याच्याकडे देण्यात आलेल्या 3000 लिटर डिझेलचा हिशोब मागण्यात आला. त्यावेळी त्याने 3000 लिटरमधील 2200 लिटर डिझेलचा पंगिंग मशिन्ससाठी वापर केला होता. तर उर्वरित 800 लिटर डिझेल रेल्वेचे उमेश गुप्ता या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीने मोहम्मद शेख याला विकण्यात आले अशी माहिती पांडे याने पोलिसांना दिली आहे. विक्री करण्यात आलेल्या डिझेलची किंमत जवळपास 75000 हजार रूपये आहे.  

संतोष पांडे याच्याकडून रेल्वे अधिकारी उमेश गुप्ता यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली जात आहे. सध्या ही चौकशी प्राथमिक टप्यात असून आतापर्यंत गुप्ता यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत असून दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.  सखोल चौकशी केल्यानंतरच या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहेत आणि या घोटाळ्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   

संतोष पांडे याने या पूर्वी अशा प्रकारे डिझेलची चोरी केली आहे का? याचा पोलिस कसून तपास करत आहेत. त्याने यापूर्वी देखील अशी डिझेल चोरी केली असेल तर हा मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. शिवाय यात आणखी अधिकाऱ्यांचा किंवा इतर कोणाचा समावेश आहे का? याचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.  

महत्वाच्या बातम्या

Cyber Terrorism : सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरला जन्मठेप; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल 

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget