Beed: बीडच्या माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तिघांची आत्महत्या
Beed: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात सर्वांना हादरून टाकरणी घटना घडलीय.
Beed: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात सर्वांना हादरून टाकरणी घटना घडलीय. माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवलीय. माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी या तिन्ही घटना घडल्यामुळं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. नैराश्यातून आत्महत्या तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे.
शिक्षकाची आत्महत्या
सुरेश रामकिसन बडे (वय, 37) असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव आहे. सुरेश हे पेशानं शिक्षक असून ते धारूर येथील गावंदरा येथे वास्तव्यास होते. त्यांनी आज पहाटे 3 वाजता माजलगाव शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथे घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली.
तरूणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
माजलगाव तालुक्यात येथील कृष्णा बाळासाहेब कोको (वय, 19) या तरूणानं अज्ञात कारणावरून कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेतला. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद झाली आहे. ही घटना राजेवाडी परिसरात बुधवारी रात्री घडलीय. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद झाली आहे.
आर्थिक व्यवहारातील जाचास कंटाळून एकाची आत्महत्या
तिसरी घटना, राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (वय, 40) या व्यक्तीनं व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नैराश्यातुन आपलं आयुष्य संपवण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी या तिन्ही घटना घडल्यामुळे तिकडे हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा-
- राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणातील चौघांना अटक ; शूटिंग दरम्यान अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप
- नामांकीत ज्वेलर्सकडून ग्राहकांना दीड कोटीचा गंडा; मासिक भिसी योजनेत पैसे गुंतवणूक करून घेत 24 ग्राहकांना गंडा
- Chandrapur Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! आईनंच सुपारी देऊन केली मुलीची हत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha