(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नामांकीत ज्वेलर्सकडून ग्राहकांना दीड कोटीचा गंडा; मासिक भिसी योजनेत पैसे गुंतवणूक करून घेत 24 ग्राहकांना गंडा
Kalyan Crime News : नामांकीत ज्वेलर्सनं ग्राहकांना दीड कोटींचा गंडा घातला आहे. मासिक भिसी योजनेत पैसे गुंतवणूक करून घेत 24 ग्राहकांना गंडा घातला आहे.
Kalyan Crime News : मुदत ठेवीवर आकर्षक परतावा देण्याचं आमिष दाखवत एका ज्वेलर्सनं तब्बल 1 कोटी 50 लाखांना गंडा घातला आहे. कल्याणमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या ग्राहकांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी मे. एस. कुमार गोल्ड अॅन्ड डायमंडचे संचालक श्रीकुमार पिल्लई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पिल्लई फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कल्याणमध्ये एका ज्वेलर्सनं आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून ग्राहकांना लुबाडल्याची घटना समोर आली आहे. मे. एस. कुमार गोल्ड अॅन्ड डायमंड या कल्याण पश्चिमेकडील ज्वेलर्सनं 4 वर्षांच्या कालावधीत ग्राहकांसाठी मासिक भिशी योजना, फिक्स्ड डिपॉझिट योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून आकर्षक परतावा देण्याचं कबुल केलं. एवढंच नाहीतर तब्बल 15 ते 18 टक्के व्याजदरानं परतावा देण्याचं आमिष ज्वेलर्सनं दाखवलं होतं. या ज्वेलर्सनं 24 जणांची 1 कोटी 56 लाख 74 हजार 539 रुपयाची फसवणूक केली.
याप्रकरणी 24 ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक करणारा संचालक पिल्लईचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या हे ज्वेलर्सचं दुकान बंद आहे. शोरुम बंद करुन शोरुमचा मालक श्रीकुमार पिल्लई हा पसार झाला आहे. देशभरात एस. कुमार ज्वेलर्सचे 13 शोरुम असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. यापूर्वी देखील काही ज्वेलर्सकडून योजनांच्या नावाखाली पैसे गुंतवून ग्राहकांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ग्राहक देखील जादा परताव्याच्या आमिषाला भुलून अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. त्यामुळे आता ग्राहकांना देखील अशा योजनांची शहानिशा करुन गुंतवणूक करणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chandrapur Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! आईनंच सुपारी देऊन केली मुलीची हत्या
- Bitcoin Fraud : तिसरी शिकलेल्या व्यक्तीने लाखो लोकांना फसवले, क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली 200 कोटी लुबाडले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha