एक्स्प्लोर

संतापजनक...! पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना; नराधम पित्यासह भाऊ, आजोबा, मामाकडून 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार

Pune Rape News : पुण्यात राहणाऱ्या एका केवळ 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि सख्खा मामाने अत्याचार केला आहे. 

Pune Rape News Updates :  पुण्यातील बंड गार्डन परिसरात (Bundgarden Police Station) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.  एका केवळ 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि सख्खा मामाने अत्याचार केला आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी समाजमाध्यमातून व्यक्त केली जात आहे. 

बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर एका 29 वर्षाच्या एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरुन बंड गार्डन पोलिसांनी पिडित मुलीचे वडील आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षाची ही मुलगी कोरेगाव पार्क येथे असणार्‍या एका इंग्लिश मीडियम शाळेत शिकत आहे. याच शाळेत समुपदेशन सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत गेल्या होत्या,  मुलींना त्या ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या 4 वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्याच वेळी घडलेला हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

तीन ते चार वर्षापासून अत्याचार

या साऱ्या प्रकाराला तीन ते चार वर्षापासून सुरुवात झाली. पहिल्यांदा 2017 मध्ये मुलगी बिहार येथे असताना आणि घरात कुणी नसताना तिच्या वडिलांनीच आपल्याच मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2020 मध्ये पीडित मुलगी ताडीवाला रोड येथे असताना तिच्या मोठ्या भावाने तिच्यावर जबरदस्ती करत तिला धमकी देखील दिली. यानंतर 2021 मध्ये देखील तिच्या आजोबांनी आणि चुलत मामांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केले.

आता या सगळ्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 08 December 2024Nandurbar Daru Bandi Voting : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजयABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 08 December 2024ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Embed widget