खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून महिलेची लूट, तृतीयपंथी आरोपी अटकेत
Crime News : लोकलमध्ये एका महिलेला खेळण्यातील बंदूकीचा धाक दाखवून लूटणाऱ्या तृतीयपंथी आरोपीला मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.
![खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून महिलेची लूट, तृतीयपंथी आरोपी अटकेत Robbery of a woman at gunpoint third party accused arrested खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून महिलेची लूट, तृतीयपंथी आरोपी अटकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/9de7c4316d27dfd2db6f3c87b55b91cc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Crime News : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली होती. त्यातच आता लोकलमध्ये एका महिलेला खेळण्यातील बंदूकीचा धाक दाखवून लूटणाऱ्या तृतीयपंथी आरोपीला मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. प्रफुल्ल उर्फ सानिया पांचाळ असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी सकाळी सव्वा सहा वाजता दादर रेल्वे स्थानकावरून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक महिला बसली होती. अंधेरी स्टेशनवर आरोपी तृतीयपंथी देखील त्याच ट्रेनमध्ये चढला आणि महिलेकडे पैसे मागू लागला. या महिलेने कमी पैसे दिले. त्यामुळे संशयिताने या महिलेला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून चार हजार रुपयांची लूट केली. लोकल बोरिवली स्थानकावर येताच आरोपी तेथून खाली उतरला आणि पळून गेला.
या घटनेनंतर संबंधित महिलेने बोरिवली जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी संशयित आरोपीला खार परिसरातून अटक केली. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर संशयित आरोपीविरुद्ध अंधेरी येथे चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिली.
दरम्यान, लोकलमधील गर्दीचा फायदा उचलून चोरी करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीवर अत्याचार
- Akola Crime News : धक्कादायक! जावयाने सासऱ्याची धारदार शस्त्राने केली हत्या
- आधी पीएवर हल्ला आता मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ
- Kalyan Crime News : डोळ्यात मिरची पूड टाकली, त्यानंतर चाकूचा धाक दाखवला अन् व्यापाऱ्याला लुटलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)