Akola Crime News : धक्कादायक! जावयाने सासऱ्याची धारदार शस्त्राने केली हत्या
Akola Crime News : रागाच्या भरात जावयाने सासऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Akola Crime News : पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी पती सासुरवाडीत गेला होता. त्यावेळी सासरे आणि जावयामध्ये भांडण झाले. रागाच्या भरात जावयाने सासऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पाथर्डी येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी येथील मृतक गजानन पवार वय 55 वर्ष यांच्या मुलीचा काही वर्षांपूर्वी उमरी येथे झाला होता. गेल्या चार महिन्यापासून मुलगी माहेरी आलेली होती. काल दिनांक 23 एप्रिल रोजी आरोपी जावाई निलेश विठ्ठल धुरंदर वय 35 वर्षीय (रा उमरी ता तेल्हारा) हा आपल्या पत्नीला घेऊन जायला चार वाजेच्या दरम्यान गेला. मात्र वडील घरी नाहीत, त्यांना येउ द्या नंतर बघू असे म्हणत पत्नीने जाण्यास नकार दिला. काही वेळाने मुलीचे वडील घरी आले. त्यावेळी जावयाने त्यांच्यासोबत वाद घालुन तेथून निघून गेला. त्यानंतर रात्री अंगणामध्ये मृतक गजानन पवार हे घराच्या अंगणामध्ये खाटेवर झोपलेले असताना आरोपी मध्यरात्री 3.30 वाजेच्या दरम्यान सासरा झोपला असताना मानेवर धारदार चाकूने वार केले. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले. जावई हल्ला करत असताना मृतक गजानन पवार यांनी अरडाओरड केली. त्यानंतर मृतकाची मुलगी धावत बाहेर आली असता तिचा पती हातामध्ये चाकू घेऊन उभा होता. यावेळी पुन्हा वार करणार तोच मृतकाच्या मुलीने आरोपी पतीला ढकलून आरडाओरड केली. तेव्हा आरोपी तेथून पसार झाला.
ही बातमी ही पसरली मृतक गजानन पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र दवाखान्यात नेण्याअगोदर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून जवळपास दोन तास शोध घेतला. खाकटा या गावानजीक आरोपी पोलिसांना गवसला. यावेळी आरोपी जावयाला अटक करून आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम 302,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
