नाशिकमध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून, कौटुंबिक वादामुळेच काढला काटा?
नाशिक जिल्ह्यात हादवरून टाकणारी एक घटना घडली आहे. येथे एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नाशिक : खून, अपघात हीट अँड रन यासाराख्या घटनांनी राज्य हादरून गेले आहे. पुणे, मुंबई यासारख्या महत्त्वाच्या शहरांत झालेल्या हीट अँड रन प्रकरणांचे पडसाद तर राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. असे असतानाच आता नाशिकमध्ये खुनाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. या खुनाप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
80 वर्षीय वृद्धेचा खून
मिळालेल्या माहितीनुसार नाशित शहरात गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत चालली असून, आज (10 जुलै) सकाळी पंचवटी भागातील म्हसरूळ गुलमोहर नगर स्वामी समर्थ केंद्राजवळ एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. कुसुम एकबोटे असे या 80 वर्षीय वृद्धेचं नाव आहे. या वृद्धेचा खून नेमका कोणी केला याचा शोध घेतला जात आहे.
कौटुंबिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज (Murder in Jalna)
या घटनेची माहिती होताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच खुनाच्या स्थळाची पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताच संशयित आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा खून घडला आहे. पोलिसांचा तसा प्राथामिक अंदाज आहे. पोलिसांनी या घटनेनंतर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस अधिकारी किरण कुमार चव्हाण यांनी दिली.
भरदविसा दगडाने ठेचून मारलं, घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद (Jalna Murder)
दुसरीकडे जालना जिल्ह्यातही खुनाचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या एका तरुणाला चाकू आणि दगडाने ठेचून मारण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 12 जणांनी मिळून हा खून केला आहे. जालना जिल्ह्यातील मंठा चौफुली भागात ही घटना घडली आहे. या हत्येचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नाशिकमध्ये डिझेल टाकून वृद्धाला जाळलं
नाशिक जिल्ह्यातही एका वृद्ध व्यक्तीला डिझेल टाकून जाळण्यात आलंय.जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादातून हा प्रकार करण्यात आलाय. खून झालेल्या व्यक्तीचे नाव कचेश्वर नागरे असे आहे. सख्ख्या भावांच्या कुटुंबीयांनीच त्यांना संपवलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक! खूनाच्या गुन्ह्यात आरोपी तरुणाची दगडाने ठेचून हत्या, 10-11 अज्ञातांकडून दिवसाढवळ्या खून
धक्कादायक! खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलावलं, अत्याचार करून अल्पवयीन मुलीचा खून; भिवंडी शहर हादरलं