Nanded : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलाचा गळा आवळून खून; गुन्हा दाखल, चार आरोपी ताब्यात
जन्मदात्या बापानेच मुलाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना देड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव येथे घडली आहे.
Nanded : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव येथे जन्मदात्या बापानेच मुलाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या खून प्रकरणात बापानेच मुलाचा गळा आवळून त्याचा मृतदेह ठिकण्यावर लावलाय. हदगाव तालुक्यातील महाताळा या गट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विराजमान असलेले अविनाश बंडू भोयर (वय 26) याचा त्याच्या जन्मदात्या पित्याने इतर तिघाजणांना सोबत घेऊन खून केल्याची घटना घडलीय. तर कौटुंबिक कलहातून बापानेच कट रचून, मुलाचा गळा आवळून खून केल्याने व त्याच बरोबर पुरावेही नष्ट केल्याचे हदगाव पोलीसांकडून निष्पन्न करण्यात आलेय. त्यामुळे या खून प्रकरणात जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलय.
24 मार्च 2022 रोजी हदगाव पोलीस स्टेशन मध्ये मयत अविनाश बंडू भोयर (वय 26 ) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार हदगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. परंतु उप जिल्हारुग्णालय येथे शवविच्छेदनाअंती गळा आवळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचा हेतू तसेच आरोपी निष्पन्न करण्याचे बिकट आव्हान हदगाव पोलिसांसमोर उभे टाकले होते. त्यानुसार हदगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनानं कार्यवाहीस सुरुवात केली. वरुला गाव गाठत सर्व प्रकरणाची गोपनीय माहिती घेतली असता या खुनाचे बिंग फुटले.
ज्यात मयत उपसरपंचाचे वडील आरोपी बंडू शेषराव भोयर (वय 58) रा. वरुला (ता. हादगाव),राजाराम देवराव जाधव (वय 56) रा.वाटेगाव (ता. हदगाव), विठ्ठल भगवानराव अंभोरे (वय 28रा.गौळबाजार (ता. कळमनुरी, विलास गोविंदराव शिंदे (वय 43) रा.बाभळी (ता.कळमनुरी) यांनी कौटुंबिक कलहातून कट रचून गळा आवळून खून केल्याचे तसेच याबाबतचे पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक श्री खैरे यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन हदगाव येथे खुनाचा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन स सर्व आरोपींना हदगाव पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहीती हदगाव पोलिसांकडून देण्यात आलीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Anil Ambani : अनिल अंबानींचा मोठा निर्णय, आर-पॉवर आणि आर-इन्फ्रा संचालक पदाचा राजीनामा
- धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवसेना नेते गणेश मोरेंचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha