Nanded Crime: अवैध गर्भपात करताना आरोग्य विभागाची धाड, डॉक्टरांसह महिलाही फरार! नक्की प्रकार काय?
या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून डॉक्टर आणि दोन्ही महिलांचा तपास सुरु आहे.
Nanded Crime: नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दोन महिलांवर अवैध गर्भपात करताना आरोग्य विभागाने छापा मारुन कारवाई केली आहे. पण अंधाराचा फायदा घेत डॉक्टरांसह दोन महिलाही फरार झाल्याचं उघडकीस आलं. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून डॉक्टर आणि दोन्ही महिलांचा तपास सुरु आहे. आरोग्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
नक्की झाले काय?
नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात बोगस डॉक्टर दोन महिलांचा अवैध्यरित्या गर्भपात करणार असल्याची आरोग्य अधिकाऱ्याला कुणकुण लागली. त्यामुळं आरोग्य अधिकाऱ्यासह त्यांच्या वैद्यकीय पथकानं घटनास्थळी छापा टाकायचे ठरवले. त्यानुसार सरसम येथील बोगस डॉक्टर पंडित वाठोरे हा नई आबादी भागातील एका घरात गर्भपात करत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाल्यानं. वैद्यकीय अधिकारी आणि खाते आपल्या पथकासह तिथे पोहोचले. पण पथक आल्याची कुणकुण लागल्याने बोगस डॉक्टर व दोन्ही महिलांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. त्यानंतर पथकाने पोलिसांना पाचारण केले. या पथकाला घटनास्थळी गर्भपात करण्याचे एम.पी.टी. कीटसह इतरही साहित्य आढळले.
पत्र्याच्या शेडच्या आडोशाला चालू होता अवैध गर्भपात
वैद्यकीय अधिकारी आणि पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगर येथील नई आबादी भागात असणाऱ्या एका पत्र्याच्या घरात हा गर्भपाताचा अवैध प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. पथकाची धाड पडणार असल्याचा सुगावा लागताच बोगस डॉक्टरसह दोन महिलाही अंधाराचा फायदा घेत फरार झाल्या. यामुळे अजून कुठे अवैध गर्भपात करणाऱ्यांचं रॅकेट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
किरकोळ वाद विकोपाला; विवाहित महिलेची तरुणाकडून निर्घृण हत्या, नेमकं प्रकरण काय?