Nashik Crime : क्रुरतेचा कळस.. सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता; तीन दिवसांनी झुडपात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरातून सात वर्षीय बालक तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
नाशिक : चांदवड तालुक्यातून (Chandwad Taluka) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वडनेर भैरव (vadner Bhairav) येथून एका सात वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे नाशिकमध्ये (Nashik Crime News) एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे मोलमजुरी करणारे परप्रांतीय व्यक्ती संतोष भगत यांच्या सात वर्षीय मुलाचे तीन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद संतोष भगत यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता.
अपहरण करून बालकाला संपवलं
सात वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने मुलाची हत्या करुन मृतदेह मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला.
बालकाचा मृतदेह सापडला
लहान मुलाला एका मंदिराजवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर आज बालकाचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात आढळून आला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबईच्या एसी लोकलमध्ये टीसीला धू धू धुतलं, शर्ट फाडला, बुक्के मारले; 3 तरुणांचं पुढे काय झालं?
स्लॅब कोसळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; आईने फोडला टाहो; माजी नगरसेवकाला दिलाय दोष