नागपुरात वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा, पैशांसाठी नातवानेच आजीचा गळा कापला
आजी पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. ही खदखद मनात असल्यानं शुल्लक कारणावरून वाद झाला आणि नातवाने आजीचा निर्घृण खून केल्याची घटना नागपूर येथे घडली आहे.
नागपूर : नागपूर शहराला हादरवून टाकणाऱ्या वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे देवकाबाई बोबडे यांचा त्यांच्या नातवानंच पैशासाठी गळा कापला. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी मितेश पाचभाई याला पैसे हवे होते. पण आजी पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. ही खदखद मनात असल्यानं शुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्यानं आजीचा निर्घृण खून केला.
मुलांपेक्षा ही जास्त प्रेम आजीआजोबा हे नातवंडांवर करतात, त्यामुळे ह्या आजीने तर कधी विचार ही नसेल केला की आपलाच नातू आपला गळा कापेल. ते ही पैशासाठी. मितेशचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले असून तो आजीच्याच घरी वरच्या मजल्यावर आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. आरोपीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये एका विद्यापीठात प्रवेश मिळवला होता. त्यासाठी 1 कोटी खर्च येणार होता ज्यातील 40 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. उर्वरित पैशासाठी आरोपी आजीकडे तगादा लावत होता आणि आजी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे असे त्याला वाटत होते. त्यामुळे ती खदखद आरोपीच्या मनात कायम होती. शनिवारी कुठल्यातरी शुल्लक बाबीवरून आजीने मितेशला टोकले असता त्याने अत्यंत क्रूरपणे देवकाबाई बोबडे यांची हत्या केली असे नागपूर पोलीस आयुक्तांनी सांगितले
हत्येच्यावेळी देवकाबाई यांनी स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला मात्र आरोपीने निर्दयतेने आजीचे हात, पाय बांधून तोंडावर पट्टी लावली आणि त्यानंतर त्यांचा धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली. तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी या हत्याकांडाचा उलघडा केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :