Nagpur Update : नागपूर पोलिसांचा हवाला व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक, 84 लाखांची रोकड जप्त
नागपूर पोलिसांनी हवाला व्यवसाय करणाऱ्या विरोधात सर्जिकल स्ट्राइक केला आहे. काल रात्री इतवारी परिसरात हवाला व्यापाऱ्यांवर मारलेल्या धाडीत 84 लाखांची रोकड जप्त केली आहे.
नागपूर : नागपूर पोलिसांनी हवाला व्यवसाय (hawala traders) करणाऱ्या विरोधात सर्जिकल स्ट्राइक केला आहे. काल रात्री इतवारी परिसरात हवाला व्यापाऱ्यांवर मारलेल्या धाडीत 84 लाखांची रोकड जप्त केली आहे. भुतडा चेंबर या इमारतीत पोलिसांना मोठ्या संख्येने खाजगी लॉकर्स आढळले असून त्यापैकी काही लॉकर उघडल्यानंतर ही 84 लाखांची रोकड हस्तगत झाली आहे. मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लॉकर असून ते पोलिसांनी सील केले आहे. त्यामधूनही हवाला व्यापाराची रोकड निघण्याची शक्यता आहे. या कारवाईनं नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसून आणखी जास्त रक्कम हस्तगत होऊ शकते असा अंदाज आहे.
नागपूरच्या इतवारी परिसरातील मस्कासाथ बाजारात नागपूर पोलिसांनी धाड टाकली. भुतडा बिल्डिंग तसेच गणेश टॉवर या दोन इमारतींमध्ये जोन 3 चे डीसीपी गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात धाड टाकली. या इमारतीमध्ये काही खाजगी लॉकर्स असून त्यामध्ये हवाला व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पद्धतीने रोकड लपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली.
काल रात्रीपर्यंत दोन लॉकर्स उघडण्यात आले होते, त्यामधून 44 लाख रुपयांची रक्कम जप्त झाली आहे. तर त्याठिकाणी असलेले इतर अनेक खाजगी लॉकर्स उघडल्यानंतर हवाला व्यवसायाची ही रक्कम कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ही सर्व रक्कम बेहिशेबी असल्यामुळे पोलिसांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
70 रुपयांमुळं बाजार उठला! सत्तर रुपयांची लाच घेणाऱ्या महाभागाला नागपुरात एसीबीकडून बेड्या