Nanded Murder: नांदेड येथील धक्कादायक घटना! मुलीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह पुरला शेतात, बापासह मामालाही अटक
Nanded Murder: न्यायालयानं दोघांना 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय.
![Nanded Murder: नांदेड येथील धक्कादायक घटना! मुलीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह पुरला शेतात, बापासह मामालाही अटक Shocking incident at Nanded! Murder of daughter's boyfriend, body buried in field, father and uncle arrested Nanded Murder: नांदेड येथील धक्कादायक घटना! मुलीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह पुरला शेतात, बापासह मामालाही अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/24/4729ae86a7c2f04263059712dbb71297_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded Murder: मुखेड तालुक्यातील मौजे हसनाळ येथील युवक सूर्यकांत नागनाथ जाधव (वय, 22) हा तरूण 31 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतल्यावर अखेर त्याच्या नातेवाईकांनी 8 नोव्हेंबर रोजी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात सूर्यकांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता अनेक खुलासे समोर येत होते. आलेल्या माहितीचे संकलन करून पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी अश्या सर्वांचे मार्गदर्शन घेत मुक्रमाबादचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी जलद गतीने गुन्ह्या संदर्भात माहितीची मिळवत काम सुरु ठेवले.
मुक्रमाबाद पोलिसांना अशी माहिती प्राप्त झाली की, सूर्यकांत जाधवचे आपल्याच नात्यातील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. जवळपास जून 2021 मध्ये त्यांच्या प्रेमाची कुणकुण पसरली. सुर्यकांत आपले गाव हसनाळ सोडले होते. तसेच तो येत्या 31 ऑक्टोबर रोजी गावात येणार आणि आपल्या प्रेयसीला घेऊन जाणार असल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळाली. त्यानुसार, मुलीचे वडील माधव सोपान थोटवे आणि मामा पंढरी मरीबा गवलवाड यांनी सुर्यकांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यांनी मौजे रावणगाव शिवारात सूर्यकांतला गाठले आणि सुर्यकांतची हत्या केली. तसेच आपल्या गुन्ह्यावर पांघरून टाकण्यासाठी माधव आणि मरीबा यांनी सूर्यकांत मृतदेह शेतात खड्डा करून पुरला.
मात्र, सूर्यकांतचा बंधु रमाकांत यांनी माधव आणि पंढरी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी माधव यांची विचारपूस केली. त्यावेळी माधव सोपानने त्यांच्या मेहुणा पंढरीसोबत मिळवून सूर्यकांतची हत्या करून त्याच्या मृतदेह शेतात पुरल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी माधव आणि पंढरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयानं दोघांना 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय. 31ऑक्टोबर रोजी झालेल्या खुनाचा उलगडा जलद गतीनं मुक्रमाबाद पोलिसानी आपलं कसब वापरून केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)