चालत्या रिक्षात धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकले, नागपुरच्या हत्येने राज्य हादरले, तपास सुरु
Nagpur Murder: पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अज्ञात मृत व्यक्ती 40 ते 45 वर्षाचा आहे. मृतकाच्या खिशात पोलिसांना लोहगाव ते वाघोली असे प्रवासाचे तिकीट मिळाले आहे.
Nagpur Murder: नागपुरात एका ऑटो चालकाने अज्ञात व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचालकानं काही सहकाऱ्यांच्या मदतीनं या व्यक्तीच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी करत धावत्या रिक्षातून रस्त्यावर फेकून दिले होते. रिक्षाचालक आणि त्याचे सहकारी या व्यक्तीला रिक्षातून खाली ढकलत असल्याची सीसीटीव्ही दृश्यही पोलिसांना मिळाली असून पोलिसांनी ऑटो चालकावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय. आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या सहकाऱ्याचा पोलीस शोध घेतायत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अज्ञात मृत व्यक्ती 40 ते 45 वर्षाचा आहे. मृतकाच्या खिशात पोलिसांना लोहगाव ते वाघोली असे प्रवासाचे तिकीट मिळाले असल्याने तो पुण्यावरून नागपूरला आला असावा असा संशय पोलिसांना आहे.पोलीस आरोपींचा शोध घेत असून हत्येमागच्या कारणाचा तपास करत आहेत.
नक्की झाले काय?
नागपुरात एका अज्ञात व्यक्तीची ऑटो चालकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसल्याने तपास अधिक कठीण झाला असून, पोलिसांनी आरोपी ऑटो चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिस तपासानुसार, आरोपी ऑटो चालकाने त्याच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने मृतकाच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर धावत्या ऑटोमधून जखमी व्यक्तीला रस्त्यावर फेकून दिले.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये आरोपी ऑटो चालक आणि त्याचे सहकारी जखमी व्यक्तीला रस्त्यावर ढकलत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हत्येच्या कारणाचा तपास सुरु, मृताची ओळख अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हा अंदाजे 40 ते 45 वर्षे वयोगटातील आहे. त्याच्या खिशात लोहगाव ते वाघोली प्रवासाचे तिकीट सापडले असून, तो पुण्यावरून नागपूरला आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत असून, या हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.