Nagpur News: नागपुरातील शेकडो झाडांच्या कत्तल प्रकरणाला वेगळं वळण; होर्डींग्जसाठी झाडांचा बळी?
Nagpur News: नागपूर शहरातील (Nagpur) रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केल्या प्रकरणात आता काही धक्कादायक शक्यता समोर आली आहे.

Nagpur News: नागपूर शहरातील (Nagpur News) रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केली आहे. दरम्यान कुठलीही परवानगी नसताना ही कत्तल करण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कापण्यात आलेल्या झाडांच्या प्रकरणात आता काही धक्कादायक शक्यता समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी आता पोलिसात तक्रार करण्यात आली असून अज्ञाता विरोधात वृक्षतोडीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा ही शोध घेतला जातोय.
होर्डिंग आणि फलक दिसावा म्हणून झाडांची कत्तल
नागपूरच्या रिंग रोड हिंगणा टी-पॉइंटपासून कळमनापर्यंत अनेक किलोमीटरपर्यंत हा रस्ता पसरला आहे. मात्र, या रिंग रोडवरील त्रिमूर्तीनगर ते छत्रपती चौक दरम्यान सुमारे चार किलोमीटरच्या अंतरावरील दुभाजकावर चार चार फुटांच्या अंतरावर लावण्यात आलेल्या शेकडो झाडं गेल्या चार वर्षात जोरदारपणे वाढले होते. दरम्यान त्यांची उंची 20 फुटांपर्यंत झाली होती. त्यामुळे जणू एक हिरवी भिंतच दुभाजकावर निर्माण झाली होती. मात्र अनेक फुटांच्या उंचीच्या या हिरवळीमुळे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटच्या पोलवर लावण्यात येणाऱ्या वैध आणि अवैध होर्डिंग तसेच इतर फलक दोन्ही बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना स्पष्टपणे दिसत नव्हते. आणि त्यामुळेच झाडांची अशी निर्दयीपणे कापणी करून त्यांची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित करण्यात आल्याची शक्यता बळावली आहे.
व्यावसायिक फायद्यासाठी झाडांची बळी?
दरम्यान टोलवर लावण्यात आलेले होर्डींग व इतर फलक लोकांना दिसावे आणि त्यामुळे व्यावसायिक फायदा व्हावा या स्वार्थामुळे झाड निर्दयीपणे कापण्यात तर आले नाही ना? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे रिंग रोडवर सुमारे 600 झाडांच्या अवैध पद्धतीने केलेल्या कापणीबद्दल पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी झाड कापणाऱ्या मजुरांची ओळख पटवली असून त्यांना बोलावून त्यांची चौकशी ही केली आहे. तसेच त्यांनी झाड कापण्याचे निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराची माहिती पोलिसांना दिली असून त्या कंत्राटदाराचा शोध सध्या सुरू आहे. झाडांची अवैध पद्धतीने कापणी केल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
