मुंबई पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई, 10 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ( Sakinaka Police) उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मोठी कारवाई केली आहे. साकीनाका पोलिसांनी लखनऊमध्ये जाऊन एमडी ड्रगवर (drugs) मोठी कारवाई केली आहे.

Mumbai Police Action : मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ( Sakinaka Police) उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मोठी कारवाई केली आहे. साकीनाका पोलिसांनी लखनऊमध्ये जाऊन एमडी ड्रगवर (drugs) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 5 किलो 500 ग्राम MD Drugs अमली पदार्थ जप्त केले आहेत. या अंमली पदार्थाचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव हा 10 कोटी रुपये आहे.
उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एका फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग बनवला जात असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी मिळाली होती. याच माहिती अनुशंगाने साकीनाका पोलिसांनी सापळा रचत लखनऊमध्ये ड्रगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे.
1. द्रव (लिक्वीड) अवस्थेत 5 किलोग्रॅम वजनाचा एम. डी ( मेफेड्रॉन ) हा अमली पदार्थ सापडला आहे. याची अंदाजे किंमत ही 9 कोटी रुपये आहे.
2. 500 ग्रॅम वजनाची एमडी हे अंमली पदार्थ असलेली पावडर देखील सापडली आहे. याची अंदाजे किंमत ही 1 कोटी रुपये आहे.
एकुण वजन - 5 किलो 500 ग्रॅम वजनाचा एम. डी ( मेफेड्रॉन ) अमली पदार्थ .
अंदाजे किंमत (आंतरराष्ट्रीय बाजार मूल्यानुसार ) 10 कोटी रुपये
दिवसेंदिवस ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय
दिवसेंदिवस ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाया देखील होताना दिसत आहेत.
दरम्यान, देशातील 7 टक्के लोकसंख्या ही अवैध ड्रग्जच्या आहारी गेल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली होती. ड्रग्ज हे एक प्रकारचे कॅन्सर असून त्यामुळे देशातील एक पीढी नष्ठ होऊ शकते. ड्रग्जच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. ड्रग्जच्या विरोधात लढण्याची ही संधी जर आपण आज वाया घालवली तर त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकल्याचे अमित शाह म्हणाले होते. सन 2004 ते 2014 या दरम्यान एकूण 3.63 लाख किलो इतके ड्रग्ज पकडण्यात आले होते. पण 2014 ते 2024 या दरम्यान त्या कारवाईत सात पटीने वाढ होऊन 24 लाख कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 2004 ते 2014 या दरम्यान नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ही 8,150 कोटी रुपये इतकी होती. तर 2014 ते 2024 या कालावधीत त्यामध्ये सात पटीने वाढ झाली. या काळात 56,861 कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट करण्यात आल्याची माहिती अमित शाहांनी दिली आहे. गेल्या काही दिवसात देशातील अवैधरित्या कार्यरत असलेल्या किमान 50 केमिकल कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
