एक्स्प्लोर

Mumbai Crime : प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध, संतापलेल्या प्रियकराने असं काही केलं की... 

प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे कळल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गळा चिरुन हत्या ( lover kills girlfriend) केल्याची घटना मालाडमध्ये (Malad Crime) बुधवारी मध्यरात्री घडली.

Mumbai Malad Murder :  प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचे कळल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गळा चिरुन हत्या ( lover kills girlfriend) केल्याची घटना मालाडमध्ये (Malad Crime) बुधवारी मध्यरात्री घडली. मनीषा पृथ्वीपाल जयस्वाल (27) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणीच्या मावसभावाच्या फिर्यादीवरुन कुरार पोलीस (Mumbai Kurar Police) ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

मानखुर्द रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपीला अटक

पोलिसांच्या माहितीनुसार प्रेयसी घरी एकटी असताना अखिलेशने तिचा गळा चिरत डोक्यावर वार करत तिची हत्या केली. अखिलेश आणि मनिषाचे प्रेमसंबंध होते आणि दोघे लग्नही करणार होते. मध्यरात्री मनिषाचा मावस भाऊ घरी आल्यानंतर हत्येची घटना उघडकीस आली. कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून मानखुर्द रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपीला अटक केली. बेपत्ता अखिलेशला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम शोध मोहिमेवर रवाना झाल्या होता. त्याच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांचे पथक मानखुर्द परिसरात पाठलाग करत गेले होते, तेव्हा तो मानखुर्द रेल्वे स्टेशनवर असल्याचे आढळला.  पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सापळा रचून अखिलेशला अटक केली.

पोलिसांना फोन कॉलची पडताळणी केल्यानंतर माहिती मिळाली

मिळालेल्या माहितीनुसार मृत मनीषाचे तिच्या मावसभावाशी संबंध असल्याची माहिती अखिलेशला मिळाली होती. त्यामुळं तो चिडला होता. पोलिसांना फोन कॉलची पडताळणी केल्यानंतर ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अखिलेश आणि मृत तरुणी आसपासच्या गावात राहायचे. 

आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन टीम बनवल्या

गुरुवारी ज्यावेळी तरुणीचा मावसभाऊ घरी पोहोचला त्यावेळी त्याला मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर तिला तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.  हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन टीम बनवल्या होत्या. तो मानखुर्द स्टेशनवर येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget