आधी पार्सल देऊन गेला, एकटी महिला बघून डिलिव्हरी बॉय परत आला अन् नको तिकडे हात लावून गेला; मुंबईच्या अंधेरीत धक्कादायक प्रकार
घरात महिला एकटीच असल्याचे पाहून डिलिव्हरी बॉयने महिलेची विनयभंग केला . पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने आधी पार्सल दिले . नंतर...

Mumbai Crime: राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत असून लैंगिक अत्याचार, किरकोळ कारणांवरून मारहाण, दिवसाढवळ्या होणारे हल्ले, महिलांवर होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे .मुंबईच्या अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे . घरात महिला एकटीच असल्याचे पाहून डिलिव्हरी बॉयने महिलेची विनयभंग केला . पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने आधी पार्सल दिले . नंतर पैसे मिळाले नसल्याचा बहाणा करत तो परत आला .पीडित महिलेने पार्सल परत केले मात्र, महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत डिलिव्हरी बॉयने अश्लील शिवीगाळही केला . पेशानं वकील असणाऱ्या पीडित महिलेची छेड काढून डिलिव्हरी बॉय पसार झाला . या घटनेनंतर पीडित महिलेने आंबोली पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली . पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे .आरोपीचा शोध घेतला जात आहे . (Mumbai Crime)
नेमके घडले काय?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या भावाने फ्लिपकार्ट अॅपवरून 'फॉग' या ब्रँडचे दोन परफ्यूम ऑर्डर केले होते. संध्याकाळच्या सुमारास अल्ताफ मिर्झा नावाचा एक व्यक्ती पार्सल घेऊन आला. त्यावेळी तिचा भाऊ घरी नव्हता, त्यामुळे महिलेनं पार्सल स्वीकारलं आणि डिलिव्हरी बॉयला सांगितलं की, तिचा भाऊ UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करेल. अल्ताफने त्याचा मोबाईल नंबर दिला आणि पीडितेच्या भावाचा संपर्क क्रमांकही घेतला. थोड्याच वेळात अल्ताफ पुन्हा परत आला आणि म्हणाला की त्याला पैसे मिळाले नाहीत. त्यानं पार्सल परत मागितलं. महिलेनं दोन्ही पॅकेजेस परत दिली. नंतर महिलेला चुकीच्या पद्धतीनं तो स्पर्श करू लागला. अश्लील शिवीगाळही त्याने केली. नंतर घटनास्थळावरून तो पळून गेला. पीडितेचा भाऊ घरी परतल्यानंतर तिने त्याला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तिने अंबोली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. अंबोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा:























