एक्स्प्लोर
डॉक्टरच्या आत्महत्येने केईएम रुग्णालयात खळबळ
आयव्ही इंजेक्शन लावून प्रणय यांनी आत्महत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. मात्र या आत्महत्यामागील कारण अद्याप कळू शकलेल नाही.
मुंबई : केईएम रुग्णालयातील वरिष्ठ रेसिंडेंट डॉक्टर प्रणय जैस्वाल यांनी आज आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. प्रणय हे 27 वर्षांचे असून केईएममध्ये सर्जरी डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठ रेसिडेंट म्हणून कार्यरत होते. ते मूळचे अमरावतीचे असून मास्टर ऑफ सर्जरीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होते.
काल रात्रीपासून प्रणय कुठे होते, याचा पत्ता त्यांच्या रुममेटलाही नव्हता. अखेर पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलीसांनी आपल्या पध्दतीने प्रणयला शोधायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी केईएम जवळच असलेल्या शिरोडकर शाळेच्या वसतिगृहावर प्रणय जैस्वाल यांचा मृतदेह सापडला.
आयव्ही इंजेक्शन लावून प्रणय यांनी आत्महत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. मात्र या आत्महत्यामागील कारण अद्याप कळू शकलेल नाही.
दरम्यान गुरुवारी केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागात अचानक शॉर्टसर्किट झालं. या घटनेत हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला. चिमुकला प्रिन्स हा उत्तर प्रदेशमधून मुंबईत खास उपचारासाठी दाखल झाला होता. शॉर्टसर्किटच्या घटनेत प्रिन्सचा हात आणि कानाचा काही भाग भाजला त्यात प्रिन्सचा हात दंडातून कापावा लागला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर आता भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर एका दिवसापूर्वी एक बोगस डॉक्टरला केईएम मधूनच अटक करण्यात आली. केईएमचा कोर्ट घालून हा केईएममध्येच फिरायचा आणि 20 रुग्णांना यानी लुबाडले होते. रुग्णालयातील प्रशासणाच्या निदर्शनास येताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. एकंदरीतचं केईएम रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement