दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या वादातून प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, डोंबिवलीतील घटनेने खळबळ
Dombivli Crime News : प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या रागातून तिची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्तीमधील कासारीआ गोल्ड संकूलमधील येथे घडली आहे.
Crime News : दुसऱ्याशी लग्न करत असल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीची हत्या कोलीय. प्रेयसीची हत्या केल्यानंतर या प्रियकराने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ललिता काळे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे तर अनिल साळुंखे असे हत्या करून आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे.
प्रेयसी आपल्याला सोडून दुसऱ्याबरोबर लग्न करत असल्याच्या राग साळुंखे याच्या मनात होता. प्रेयसीला शेवटचे भेटण्याच्या निमित्ताने तो तिच्या घरी गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने नायलॉन दोरीने तिचा गळा आवळून आणि उशीने नाक तोंड दाबून तिची हत्या केली. त्यांनतर त्याच नायलॉन रस्सीने स्वता गळफास घेत त्यानेही आत्महत्या केली. डोंबिवली पूर्व निळजे कासारिया गोल्ड या हायप्रोफाइल सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक मधील वडनेर भैरव येथे राहणाऱ्या अनिल साळुंखे याचे डोंबिवलीत निळजे कासारियो गोल्ड सोसायटीमध्ये राहणाऱ्या ललिता काळे या तरुणीबरोबर प्रेम संबध होते. मात्र, अनिल हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती ललिताच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळे कुटुंबीयानी तिचे लग्ण दुसऱ्या मुलाशी ठरवले होते. काही दिवसापूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करत असल्याची माहिती अनिलला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या अनिल याने 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास शेवटचे भेटण्याच्या बहाण्याने लालिताचे घर गाठले.
अनिल हा ललिताच्या घरी गेल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यातूनच रागाच्या भरात त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याच नायलॉन रस्सीने त्याने स्वत: पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हाक मारूनही ललिता रूपमचा दरवाजा उघडत नसल्याने ललिताच्या बहिनेने दरवाजा उघडला. यावेळी खोलीत ललीचाता मृतदेह आढळून आला तर अनिल यानी पंख्याला गळफास घेतला होता. याप्रकरणी कुटंबीयांनी मानपाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.