Dhule Crime News : धुळ्यातील 95 लाखांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश, नाशिकमधील तीन जणांना बेड्या
Dhule Crime News : धुळ्यातील 95 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. सायबर पोलिसांनी नाशिकमधून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
Dhule Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या (Dhule News) अवधान येथील महाराष्ट्र ऑईल एक्सट्रक्शन प्रा.लि. कंपनीचे संचालक असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याला तब्बल 95 लाखांत गंडविल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नाशिक (Nashik) येथील तिघांना जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र ऑईल एक्सट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक असल्याचे भासवून कंपनीच्या अकाऊंटंटला व्हॅटसअप मेसेज करून एका नवीन प्रोजेक्टची बोलणी फायनल झाली असून त्या प्रोजेक्टची आगाऊ रक्कम भरण्यासाठी 95 लाख रूपये दिलेल्या अकाऊंटवर आरटीजीएसद्वारे भरण्यास सांगितले.
95 लाखांची सायबर फसवणूक
व्हॅटसअपच्या डीपीवर कंपनीच्या मालकाचा फोटो पाहून हा मेजेस मालकांनी केलेला असल्याचे अकाऊंटंटला वाटले. त्यानुसार त्यांनी तात्काळ 95 लाख रूपये आरटीजीएसद्वारे खात्यात वर्ग केले. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी 85 लाखांची मागणी केल्यानंतर अकाऊटंटने कंपनीच्या इतर मालकांकडे सदरची बाब सांगितली. यावेळी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
नाशिकमधील तीन जणांना बेड्या
यानुसार सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून नाशिक येथे आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले होते. पथकाने आरोपी मुजम्मील मुस्तक मनियार (25), सरफराज हुसैन शेख (27), या दोन आरोपींसह चांदवड येथून आवेश रफिक पिंजारी यास पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या चौघांना अटक
दरम्यान, शिरपूर येथील पळासनेरच्या जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडून देतो, अशी बतावणी करत दीड लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दोन जणांनी आम्ही पैशांचा पाऊस पाडून देतो, असं सागून त्या बदल्यात दीड लाख रुपये द्या, असा व्यवहार ठरवला होता. दरम्यान, पैशांचा पाऊस पडला नाही, त्यामुळे मध्य प्रदेश येथील चौघांना दिलेले दीड लाख माघारी मागण्यात आले. मात्र, संबंधितांनी हे पैसे परत देण्यास नकार दिला. त्यादरम्यान त्यांच्यात झालेल्या झटापटीत दोन फायर बंदुकीतून देखील झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील चौघा आरोपींना पोलिसांनी मध्य प्रदेश येथून जेरबंद केले आहे.
आणखी वाचा