Crime News : पोलीस उपनिरीक्षकाची दोन मुले वॉन्टेड; हिंगोलीत खळबळ
Hingoli Crime News : हिंगोलीमधील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराच्या बॅनरची चर्चा सुरू आहे. या बॅनरमध्ये वॉन्टेड गुन्हेगार म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलांचा समावेश आहे.
Hingoli News : हिंगोली शहरातील चौकाचौकात सध्या ४ वॉन्टेड आरोपींचे पोस्टर झळकत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या चार वॉन्टेड आरोपींमध्ये दोन जण पोलीस उपनिरीक्षक रुस्तुम काळे यांची मुलं आहेत. सागर रुस्तुम काळे आणि विकी रुस्तुम काळे हे दोन सख्खे भाऊ वॉन्टेडच्या बॅनरवर झळकत आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा शहरामध्ये सुरू आहे.
हिंगोलीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. शहरात दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी वॉन्टेड घोषित केलं आहे. या आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 307 सह अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी या वाँटेड गुन्हेगारांचे बॅनर शहरामध्ये लावले आहेत. आता पोलीस या पोलिसांच्याच मुलांना कधी अटक करतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली शहरातील चौकाचौकांमध्ये चे बॅनर लावण्यात आले आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिसांच्यावतीने बक्षिसंसुद्धा जाहीर करण्यात आले आहे. या चारही आरोपींच्या विरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसात 307 आणि ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल असल्याचे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे. चार आरोपींपैकी सागर आणि विकी काळे हे दोघे सख्खे भाऊ पोलीस अधिकाऱ्याची मुलं आहेत. करण राजपूत व अक्षय गिरी असे अन्य दोन आरोपींची नावे आहेत. यापैकी एक आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांच्या मुलांकडून गुन्हे घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
हिंगोली ग्रामीण पोलिस स्थानकामध्ये 2 मार्च रोजी सागर काळे आणि विकी काळेसह अन्य तीन जनावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 आणि ॲट्रॉसिटी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींनी दिनांक 23 फेब्रुवारीला बेलवाडी गावाच्या शिवारात एका आखाड्यावर जाऊन फिर्यादीला तलवार कोयता आणि रॉड च्या साह्याने गंभीर मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती यावरून या आरोपींविरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर हे आरोपी फरार झाले आहेत.
पोलीस हतबल?
पोलिसांनी अशा पद्धतीने वॉन्टेड आरोपी घोषित केल्यामुळे पोलिसांची हतबलता उघड झाली आहे कारण जर पोलिसांना हे आरोपी अटक करणे शक्य असते तर पोलिसांनी हे बॅनर का लावले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Bhiwandi : मुलाच्या मदतीने बापाने केली दुसऱ्या मुलाची निर्घृण हत्या; बापलेकांना अटक
- Buldhana : पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर दोघांकडून बलात्कार, बुलढाण्यातील घटनेने खळबळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha