Bhiwandi : मुलाच्या मदतीने बापाने केली दुसऱ्या मुलाची निर्घृण हत्या; बापलेकांना अटक
Bhiwandi Crime : जमिनीच्या वादातून मुलाच्या मदतीने बापाने दुसऱ्या मुलाची निर्घृण हत्या केली आबे . हत्येप्रकरणी बापलेकांना अटक करण्यात आली आहे. ही घटना भिवंडी येथे घडली आहे.

भिवंडी : जमिनीच्या वादातून सख्ख्या बापाने मुलाच्या मदतीने आपल्या दुसऱ्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कशिवली या गावात घडली आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी बाप लेकाला अटक केली आहे. कचरू गोविंद पाटील व गणेश कचरू पाटील अशी अटक केलेल्या वडिल आणि भावाची नावे आहेत. तर काशिनाथ कचरू पाटील (वय 55) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
शेतात कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या
भिवंडी तालुक्यातील धामणगाव कशिवली या गावात मृत काशिनाथ पाटील व त्यांचे आरोपी वडील कचरू पाटील व भाऊ गणेश यांच्यात मागील वर्षभरापासून जमिनीच्या वाटणी वरून वाद सुरू होता. त्यात मृत काशीनाथ पाटील व त्यांचा मुलगा धनंजय असे रविवारी शेतावर जळणासाठी लाकूडफाटा जमा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात काशीनाथ यांचे आरोपी वडील कचरू व भाऊ गणेश या ठिकाणी येऊन यापूर्वी तू जीवानीशी वाचला पण आता नाही वाचू शकणार असे सांगत शिवीगाळ करत मारहाणीस सुरुवात केली. त्यानंतर आरोपी गणेश याने पुतण्या धनंजय याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यावेळी वडील काशीनाथ मुलाच्या बचावासाठी पुढे आले असता आरोपी वडील कचरू यांनी कुऱ्हाडीने काशिनाथच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले आणि घटनस्थळावरून पळ काढला. हल्ल्यानंतर मृतक मुलगा धनंजयने गंभीर अवस्थेत वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
संबंधित बातम्या :























