एक्स्प्लोर

Crime News: मुंबईत 24 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट जप्त, 5 आरोपींना अटक

Cigarettes Smuggling: डीआरआय मुंबईने न्हावा शेवा बंदरातून एका कंटेनरमधून 24 कोटी रुपये किमतीच्या बंदी असलेल्या विदेशी सिगारेट जप्त केल्या आहेत.

Cigarettes Smuggling: डीआरआय मुंबईला (DRI Mumbai) विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, न्हावा शेवा बंदरात सिगारेटची तस्करी करणाऱ्या कंटेनरची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयने संशयित कंटेनर ओळखला. या कंटेनरमधून सुमारे 24 कोटी रुपयांचे बंदी घालण्यात आलेले विदेशी सिगारेट जप्त केले आहेत. सिगारेट तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सूत्रांकडून डीआरआयला मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर आशिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार होता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्या कंटेनरच्या हालचालीवर विशेष नजर ठेवली होती. बंदरातून बाहेर पडल्यानंतर तो कंटेनर ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याऐवजी खासगी गोदामात नेला जात असल्याचे आढळले.

बंदी असलेल्या विदेशी सिगारेटने भरला होता 40 फूट कंटेनर

कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्यांनी कंटेनर गोदामात अडवला. तपासणीत, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना 40 फूट कंटेनर विदेशी सिगारेटने भरल्याचे आढळून आले. अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिगारेटच्या आयातीवर भारतात बंदी आहे. 

 सीमाशुल्क अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी ही सिगारेट कंटेनरमधून बाहेर काढत त्यात कागदपत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या वस्तू भरण्यात येणार होत्या. तपासणीत गोदामात कागपत्रांमध्ये घोषित केलेला माल यापूर्वीच भरून ठेवण्यात आला होता. 

प्रकरणी पाच जणांना अटक

आयात केलेल्या कंटेनरमधून एस्से (Esse), मॉन्ड (Mond), डनहिल (Dunhill) आणि गुडंग गरम (Gudang Garam) या विदेशी सिगारेटच्या 1 कोटी 7 लाख सिगारेट सापडल्या. तसेच यापूर्वी तस्करी करून आणण्यात आलेल्या एस्से लाईट (Esse Light), मॉन्ड (Mond) या 13 लाख विदेशी सिगारेटचा साठाही सापडला. या कारवाईत एकूण 1 कोटी 20 लाख सिगारेट जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 24 कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी आयातदारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

बऱ्याच परदेशी सिगारेटला भारतात मोठी मागणी आहे. पण या परदेशी सिगारेटच्या आयातीवर बंदी असल्यामुळे त्यांची तस्करी केली जाते. लॉकडाऊनच्या काळात परदेशी सिगारेटच्या मागणीत प्रचंड वाढ झाली, त्यामुळे या सिगारेटच्या तस्करीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या काळात दोन महिन्यात 30 कोटी रुपयांच्या सिगारेट न्हावा शेवा बंदरावरून पकडण्यात आल्या होत्या. पण कोरोना काळानंतरही या तस्करीत घट झालेली नाही. मागणी अधिक असल्यामुळे भारतात आजही मोठ्या प्रमाणात या सिगारेटची तस्करी केली जाते. विशेषत: दुबईतून भारतात मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेटची तस्करी केली जाते.

हेही वाचा:

Sunil Kanugolu: करेक्ट प्लानिंग अन् अचूक टायमिंग; काँग्रेसच्या कर्नाटक विजयचा रियल हिरो, कोण आहेत सुनील कानुगोलू?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget