Bopdev Rape Case : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचललं, तिसरा आरोपी अजूनही फरार
Bopdev Rape Case : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.
Bopdev Rape Case : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बोपदेव घाटातील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून अटक केलीय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलाहाबादमध्ये जात आज (दि.14) अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी आधीच अटकेत असून तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार आहे.
तिघांकडून 21 वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार
पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत दोन आरोपी अटक तर अजून एक आरोपी फरार आहे. पुण्यातील बोपदेव घाटात तिघांनी मिळून 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केला होता.
न्यायालयाकडून पहिल्यांदा अटक झालेल्या आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 25 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पुणे पोलिसांनी या आरोपीला शुक्रवारी (दि.14) पहाटे येवलेवाडी परिसरातून अटक केली होती. त्यानंतर त्याला शनिवारी (दि.14) दुपारी शिवाजीगर येथील पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयाने 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
सरकारी वकिलांनी न्यायालयात काय काय म्हटलं होतं?
बोपदेव प्रकरणात आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. आरोपींच्या दोन साथीदारांना अटक करायची आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे. आरोपींनी लूटमार करण्यासाठी वापरलेले हत्यार, वाहन जप्त करायचे आहेत. आरोपींनी पीडितेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली असून, ती हस्तगत करायची आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. अन्य आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला होता. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या