एक्स्प्लोर

Mumbai Police : बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती, पण 3 पोलीस तैनात होते, 1 जण घटनास्थळी होता, लॉरेंन्स बिश्नोई गँगबाबतही मुंबई पोलिसांचे मोठे खुलासे

Mumbai Police on Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांना Y प्लस सुरक्षा नव्हती, तर त्यांच्या सुरक्षेसाठी 3 पोलीस तैनात करण्यात आले होते, असा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.

Mumbai Police on Baba Siddique Murder Case : "बाबा सिद्दीकींना सुरक्षा होती, मात्र नॉन कॅगराईज सुरक्षा होती. त्यांना Y प्लस सुरक्षा नव्हती. मात्र, तीन पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर होता. घटनास्थळी ज्यांनी गोळीबार केला, ते तीन लोक होते. त्यातील दोन पकडण्यात आले होते. एकजण फरार झाला होता. त्याचा तपास करण्यात येतोय. काही बाबी मी सविस्तर माहिती देऊ शकत नाही", अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे. बाबा सिद्दिकी प्रकरणी गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी आज (दि.13) यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. 

लॉरेंन्स बिश्नोई किंवा सलमान खान या प्रकरणात आम्ही सर्व अँगलचा तपास करतोय 

दत्ता नलावडे म्हणाले, आरोपींकडून दोन पिस्तुल आणि 28 काडतुसं आम्ही जप्त केले आहेत. आम्हाला 21 ऑक्टोबर पर्यंत आरोपीची कोठडी मिळाली आहे. आम्ही या प्रकरणात लॉरेंन्स बिश्नोई गँगचा जो रोल आहे, त्याबाबतही चौकशी करत आहोत. बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तिघांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. त्यातील दोघांना ताबडतोब पकडण्यात आले. लॉरेंन्स बिश्नोई किंवा सलमान खान या प्रकरणात आम्ही सर्व अँगलचा तपास करत आहोत. आमच्या टीमकडून सर्व अँगलमध्ये तपास सुरु करण्यात आला आहे. 

लॉरेंन्स बिष्णोई गँगच्या सहभागाबाबत आम्ही तपास करत आहोत

पुढे बोलताना दत्ता नलावडे म्हणाले, बाबा सिद्धीकी याना वायप्लस सुरक्षा नव्हती, त्यांना नियमीत सुरक्षा होती. घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी होते. गुन्हेशाखची 15 टीम या प्रकरणाच्या तपासासाठी बाहेर आहेत. लॉरेंन्स बिष्णोई गँगच्या सहभागाबाबत आम्ही तपास करत आहोत. या प्रकरणात आरोपींवर या पूर्वी कुठल्या गुन्ह्याची नोंद आहे का हे तपासत आहोत. जे दोन फरार आरोपी आहेत त्याचीही ओळख पटली आहे. त्यांचाही शोध सुरु आहे. बाहेरच्या पोलिसांच्या मदतीची गरज पडत आहे, त्यांच्याकडूनही आम्ही सहाय्यता घेत आहोत. टेक्निकल आणि ग्राऊंड लेव्हलला चौकशी सुरु आहे. इतर काही गोष्टींची सहाय्यता घेऊन आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Baba siddique Murder case : तिन्ही आरोपी हरियाणाच्या जेलमध्ये एकत्र, मुंबई आल्यावर जुहू बीचवर आठवण म्हणून फोटो काढले, बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Government : महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
MSRTC Ticket Hike Cancelled : मोठी बातमी, दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय,  प्रवाशांना दिलासा
प्रवाशांची दिवाळी गोड होणार, एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द, महामंडळानं घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray angiography : उद्धव ठाकरेंच्या धमन्यांध्ये आढळले ब्लाॅकेजTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2:30 PM : 14 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNana Patole New Delhi :भाजपने कितीही वाईट रणनिती केली तरी महाराष्ट्रात मविआ सरकार येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti Government : महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा आरोप करणारी याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
MSRTC Ticket Hike Cancelled : मोठी बातमी, दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय,  प्रवाशांना दिलासा
प्रवाशांची दिवाळी गोड होणार, एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द, महामंडळानं घेतला मोठा निर्णय
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती
Maharashtra Assembly Election 2024 : परभणीत विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जोरदार घमासान; भाजप पदाधिकाऱ्यांचा गंभीर इशारा, म्हणाले...
परभणीत विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जोरदार घमासान; भाजप पदाधिकाऱ्यांचा गंभीर इशारा, म्हणाले...
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या,  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
Embed widget