Baba Siddique Murder Case : पाच शहरांमध्ये नेटवर्क, मुंबईत येऊन कडक सुरक्षा भेदली, बाबा सिद्दिकींच्या हत्येमागील 5 मास्टरमाईंड कॅरेक्टर
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर रविवारी (दि.14) मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे समर्थक, चाहते, राजकीय आणि बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर आत्तापर्यंत 5 नावं समोर आली आहेत. यामध्ये शिव कुमार गौतम, मोहम्मद झिशान अख्तर, शुभम लोणकर, गुरमेर सिंग आणि धर्मराज अश्यप , अशी या पाच आरोपींची नावे आहेत.
शिवकुमार गौतम आणि झिशान अख्तर यांचा शोध सुरु
मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये एकाच नाव शिवकुमार आहे, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला आरोपी गुरमेर सिंग हा 23 वर्षीय आहे. तो हरियाणाच्या कैथल या जिल्ह्यातील नरड गावचा राहिवासी आहे. दुसरा आरोपी धर्मराज कश्यपहा 19 वर्षीय आहे. तो उत्तर प्रदेशच्या बहराइच या गावचा आहे. सध्या शिव कुमार गौतम, मोहम्मद झिशान अख्तर आणि शुभम लोणकर याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी पिस्तुल आणि 28 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. चार मोबाईल फोन आणि आधारकार्डही आरोपींकडे सापडले आहेत.
शिवकुमार आणि धर्मराज उत्तरप्रदेशचे राहिवासी
धर्मराज आणि शिव कुमार दोघेही उत्तरप्रदेशच्या बहराईच या गावचे राहिवासी आहे. शिवकुमार आणि धर्मराज यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांना सापडलेली नाही. शिवकुमारची आई मीडियाशी बोलताना म्हणाली, मी सकाळी उठल्यानंतर माझ्या कामाला सुरुवात केली होती. तेव्हा मला समजले की, माझा मुलगा मुंबईत अडकला आहे. माझा मुलगा पुण्यात राहत होता. मी विचारले की, ते लोक पुण्यात राहत होते, मुंबईत कसे पोहोचले? शिवा माझा मोठा मुलगा आहे. होलीच्या 8 दिवसानंतर तो इथून निघून गेला. यापूर्वी त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही.
धर्मराजची आई म्हणाली, पोलीस आले होते. ते म्हणाले तुमचा मुलगा कोठे आहे? मी म्हणाले पुण्यात आले. पोलीस पुढे म्हणाले, त्याच्याबाबत काही ऐकले आहे का? मी म्हणाले, मी म्हणाले माझे मुलासोबत कोणतेही बोलणे झालेले नाही. पोलिसांनी माझं बोलणं ऐकून लिहून घेतलं.
पोलिसांकडून शुभम लोणकरचा तपास सुरु
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि शुभम लोणकर यांनी कथित शूटर असलेल्या तीघांना सिद्दिकी यांची हत्या करण्याचे काम सोपवले होते. अधिकारी पुढे बोलताना म्हणाले, आम्ही शुभम लोणकरला शोधण्यासाठी पुण्यात गेलो होतो. मात्र, तो तेथे मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण लोणकरचा भाई शुभम लोणकर याला ताब्यात घेतले. शुभम लोणकरने फेसबुक पोस्ट टाकत बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
गुरमेर सिंग सराईत गुन्हेगार, बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी स्पॉटवर
गुरमेर सिंग हरियाणाच्या कैथलमधील नरडचा राहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात केवळ त्याची आजी आहे. गुरमेरच्या आजीने सांगितले की, 12 वर्षांपूर्वीच आम्ही त्याला कुटुंबातून बेदखल केले आहे. तो माझा नातू आहे. मात्र, आता माझं आणि त्याचं कोणतंही नात नाही. आता त्याला कोणी मारुद्या किंवा सोडून द्या. आमचं काही देण घेणं नाही. त्याचा आम्हाला गेल्या चार महिन्यांपासून कोणताही पत्ता नाही. तेव्हापासून त्याचा कोणताही फोन आलेला नाही. तो घरीही येत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या