एक्स्प्लोर

बीडसह संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Beed News Update : बीड जिल्ह्यातील गेवराई बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीची हत्या करण्यात आली होती.

Beed News Update : बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोमा शेरू भोसले आणि लखन प्रताप भोसले अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. पती-पत्नी आणि त्यांच्या गरोदर मुलीचा दोन्ही आरोपींनी खून केला होता. या प्रकरणी 22 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश हेमंत महाजन यांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या दोन मुलींवर देखील हल्ला केला होता. उपचारादरम्यान गरोदर मुलीचा मृत्यू झाला होता. पाच वर्षांपूर्वी ही धक्कादयक घटना घडली होती. या हत्याकांडानं बीडसह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. घटनेनंतर या प्रकरणी न्यायालयात केस सुरू होती. त्यावर आज सुनावणी करत दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

 काय आहे प्रकरण? 

गेवराई शहरातील गणेशनगरमधील सरस्वती कॉलनीत बँक अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय, 50) राहत होते. 24 ऑगस्ट 2017 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कटावणीने कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी आदिनाथ आणि त्यांची पत्नी अलका घाडगे ( वय, 42) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यानंतर त्यांची बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव ( वय, 22) आणि स्वाती घाडगे ( वय, 18) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला करून ऐवज लुटला होता. यात जखमी वर्षाचा उपचारादरम्यान वर्षभरानंतर मृत्यू झाला होता. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. त्यानंतर सोमा शेरू भोसले (रा. केकतपांगरी ता. गेवराई, हमु. अचानकनम गेवराई) आणि लखन प्रताप भोसले (रा. कौडगा घोडा ता.परळी) यांना अटक केली होती. आरोपींकडून घाडगे यांच्या घरातून चोरून नेलेला मोबाइल हस्तगत केला होता. तपास करून उपाधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.  

न्यायाधीश हेमंत महाजन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. त्यांनी 22 साक्षीदार तपासले. अजय राख यांचा युक्तिवाद, साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायाधीय हेमंत महाजन यांनी दोन्ही आरोपींना 16 जानेवारी रोजी दोषी ठरवले आणि आज दोघांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सनावली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका?  : जितेंद्र आव्हाडMaharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णयBhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधवRavindra Dhangekar : वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदीचं प्रकरण हे  माझ्याविरोधातलं षडयंत्र-धंगेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
Guillain Barre Syndrome : नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
SIP : 10000 रुपयांच्या एसआयपीनं 'या' म्युच्युअल फंडनं अनेकांना केलं कोट्याधीश, दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या
SIP : 10000 रुपयांच्या एसआयपीनं 'या' म्युच्युअल फंडनं अनेकांना केलं कोट्याधीश, दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या
Eknath Shinde : मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
मोठी बातमी : रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार शिवसेनेत, एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार!
Embed widget