एक्स्प्लोर

Badlapur School: “ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Badlapur School: शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शाळेचे संचालक किंवा अन्य कोणीही पालकांसमोर आलेले नाही. त्यामुळे बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

Badlapur Crime: देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण नेमके कसे उघडकीस आले, याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पीडितेपैकी एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आला. हा संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची अमानुष पद्धतीने हत्या केल्याच्या मुद्दयावरुन  सध्या देशभरातली वातावरण तापले आहे. मात्र, मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार (Badlapur school girl sexual abuse) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जयेश वाणी हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला, याबद्दल सांगितले आहे.

जयेश वाणी यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या. 

आणखी वाचा

बदलापूरमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार, पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याची कंट्रोल रुमला बदली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget