एक्स्प्लोर

Badlapur School: बदलापूरमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार, पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याची कंट्रोल रुमला बदली

Crime News: बदलापूरमध्ये नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्यांकडून मुलींचं लैंगिक शोषण, मुख्याधापिका-शिक्षिकेला नोकरीवरुन काढलं, बदलापूर बंदची हाक. शाळेच्या गेटसमोर हजारो नागरिकांचा जमाव. पोलीस काय कारवाई करणार?

बदलापूर: देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना कानावर येत असतानाच बदलापूर शहरात एक धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारानंतर स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.  जेव्हा पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले. 

मात्र, या प्रकरणावरुन गदारोळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांकडून याप्रकरणात चालढकल केल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र, यानंतरही पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिकांचा रोष शमलेला नाही. बदलापूरमधील नागरिकांनी मंगळवारी शहरात बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून बदलापूरमध्ये रस्त्यांवर तुरळक वाहने दिसत आहेत. 

नागरिकांचा जमाव शाळेच्या गेटवर धडकला

या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका, संबंधित वर्गशिक्षिका आणि दोन सहायक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अद्याप याबाबत पालकांसोबत समोरासमोर चर्चा केलेली नाही. शाळेचे प्रशासन बोलायला तयार नसल्याने पालक सध्या प्रचंड संतापले आहेत. त्यांना शहरातील नागरिकांची साथही मिळाली आहे. मंगळवारी सकाळी बदलापूरमधील संतप्त नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर धडकला. याठिकाणी नागरिकांकडून प्रचंड घोषणबाजी करण्यात आली. मात्र, अद्याप शाळा चालवणाऱ्या प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीने पालकांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही. नागरिकांचा जमाव शाळेच्या गेटवर धडकून तीन तास उलटले तरी शाळा प्रशासनाकडून कोणीही चर्चेला आलेले नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. याप्रकरणात पोलीस कोणावर कारवाई करणार, हेदेखील बघावे लागेल.

शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे. आरोपीविरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केले, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा

बदलापूरच्या नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण, पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Embed widget