(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच आहात. खोटं बोला पण रेटून बोला असं मोदी यांचं असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली.
Mallikarjun Kharge on PM Modi : महायुती सरकार विचारधारेसाठी सत्तेत आलं नाही, तर आमदार चोरून सत्तेत आली. महायुती लोकांना भडकावून का निवडणुकीला पुढे जाते? सरळ मार्गाने का निवडणुका लढत नाही? एक है सेफ है की बटेंगे तो कटेंगे यापैकी मोदींची लाईन मानायची की योगींची मानायची? असा सवाल करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुतीसह पीएम मोदी यांच्यावर घणाघाती प्रहार केला. मोदी खोटं बोलणाऱ्यांचे सरदार असल्याची टीका सुद्धा खरगे यांनी केली. बटेंगे तो कटेंगे असं म्हणतात, एक है सेफ है म्हणतात, कुणाला तोडायचं आहे. देशाला एक ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जीवन दिलं आहे. महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच आहात. खोटं बोला पण रेटून बोला असं मोदी यांचं असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली.
देशाला एक ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जीवन दिलंय
महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. बेरोजगारी, शेतकरी समस्या, तरुण, नशेची समस्या, महिला सुरक्षित नाही. भाजप सरकार आल्यावर इथे, प्रशासन चांगलं चालत नाही. या निवडणुकीत महाराष्ट्राला पुन्हा प्रगती पथावर आणायचं आहे. आमचे आमदार चोरी करुन सरकार स्थापन केलं. त्यांनी सांगितले की, भडकवणारे भाषण देतात आणि लोकांचे लक्ष विचलित करतात.
मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार
त्यांनी सांगितले की, कर्नाटकात योजनांची अंमलबजावणी नाही असा आरोप करतात. पण मोदीजी यांनी कर्नाटकामधील बजेट वाचावं. कर्नाटकात वीज सवलत योजनांसाठी 9 हजार कोटी ठेवले आहेत. कर्नाटकात महिलांना बसेस फ्री असून पाच हजार 15 कोटींची तरतुद केली आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मीसाठी कर्नाटकात दोन हजार एक महिलेला दिले जात आहेत, यासाठी 28 हजार 608 कोटींची तरतूद केली आहे. मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार आहेत.
राष्ट्रपतींना तेच लाल संविधान मोदीजी यांनी भेट दिलं
खरगे म्हणाले की, संघ योगींसोबत आहे, संघाची लाईन योगी बोलत आहेत. संविधान संरक्षण कुणाला नको. लाल संविधान म्हणाले, शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केलाय जात आहे. राष्ट्रपतींना तेच लाल संविधान मोदीजी यांनी भेट दिलं आहे. यावेळी त्यांनी लाल संविधान दाखवलं.
इतर महत्वाच्या बातम्या