Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मी मुंबईकर आहे, ज्याला कोणाला चॅलेंज करायच असेल त्यांनी करावं, मुंबई महापालिकेत 90 टक्के कॉन्ट्रॅक्टर अमराठी आहेत, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला जबाबदार शिवसेना आहे. मी मुंबईकर आहे, ज्याला कोणाला चॅलेंज करायच असेल त्यांनी करावं, मुंबई महापालिकेत 90 टक्के कॉन्ट्रॅक्टर अमराठी आहेत, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झाली आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असेही म्हटले आहे. सिंधी मारवाडी समाजाला माझं म्हणणं आहे धंदा वाढवायचा असेल तर भाजप प्रेम कमी करा, असा खोचक सल्लाही दिला.
राहुल गांधी जे संविधान घेऊन फिरतात ते भाजपनेचं प्रिंट केलं आहे
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजप आणि काँग्रेस दोघ एकसारखेच आहेत. हिंदू कोडं बिल निर्माण करताना पाहिला विरोधक हिंदू महासभा, आरएसएसआणि साधू संतांना पुढ करण्यात आलं. मात्र, साधूसंतांशी जेव्हा बाबासाहेब बोलले तेव्हा बाबासाहेबांना साधू संतांनी पाठिंबा दिला. संसदेत जे संविधान आहे ज्यावर सर्वांच्या सह्या आहेत. त्याचा रंग काय हे फडणवीस यांनी सांगावे हे माझं चॅलेंज असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी जे संविधान घेऊन फिरत्यात ते भाजपनेचं प्रिंट केलं आहे.
तर लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणण्याची गरज पडणार नाही
ते पुढे म्हणाले की, पुणे आणि सोलापूर दोघात साम्य आहे. दोघांनी सर्वांत जास्त मंत्री पद भोगली आहेत. पण आणखी एक साम्य असून तहानलेले जिल्हे आहेत. सोलापूरला पाण्यासाठी नऊ दिवस थांबणायची गरज नाही, असं मी उमेदवार असताना म्हटलं होतं. पण पाच वर्ष झाली नवीन खासदार आले, पण परिस्थिती तशीच आहे. दोष एकतर लोकप्रतिनिधीमध्ये आहेत किंवा मतदारांमध्ये आहे असं मी मानतो. सोलापूर शहर दुर्लक्षित आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर स्वीकारावे. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तर लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणण्याची गरज पडणार नाही. टेकस्टाईल उद्योगामुळे सोलापूरचे नावं जगाच्या पटलावर आहे, सोलापुरात टेकस्टाईल कमिशनर ऑफिस असायला हवं. सिंधी मारवाडी समाजाला माझं म्हणणं आहे धंदा वाढवायचा असेल तर भाजप प्रेम कमी करा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या