एक्स्प्लोर

Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी

Akshy shinde funeralअक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याचे निश्चित मानले जाते.

Akshy shinde funeral: ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटूनही अद्याप त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली असून आता अंत्यविधीसाठी फक्त आजचाच दिवस उरला आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचा (akshay shinde) अंत्यविधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. त्यातच, आता उल्हासनगर (ulhasnagar) येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, येथील स्मशानभूमीत पोलिसांकडून (Police) खड्डा खोदण्यात आला असून येथे त्याच्या मृतदेहाचे दफन करण्यात येत आहे. मात्र, उल्हासनगर येथेदेखील अक्षय शिंदेच्या पार्थिवाचे दफन करण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे, मोठ्या पोलीस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला आहे. 

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याचे निश्चित मानले जाते. अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर, अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती. मात्र, अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर, उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्यात आला. मात्र, येथेही स्थानिकांकडून विरोध होत आहे. अक्षय शिंदे याच्या दफन विधीसाठी खोदलेला खड्डा येथील कार्यकर्त्यांनी बुजवला होता, तो खड्डा पुन्हा उतरण्यासाठी जेसीबी स्मशानभूमीत आणण्यात आला. त्यानंतर, पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा हा खड्डा खोदण्यात आला.  

दरम्यान, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने आज अक्षयच्या आई-वडिलांना शवागृहात नेले होते. त्यानंतर, अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या आई आणि वडिलांनी ताब्यात घेतला, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शववाहिका उल्हासनगर दिशेने निघाली. उल्हानगरमध्ये कडक पोलिस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचे दफन करण्यात येत आहे. मात्र, येथेही स्थानिकांनी स्मशानात धाव घेत अंत्यविधीला विरोध केला आहे. दरम्यान,  अक्षयच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यासाठी आता फक्त आजचा एकच दिवस उरला असून त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला अक्षय शिंदेचा अंत्यविधी करावा लागणार आहे. त्यातच, आता उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदण्यात आला होता, तेथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

3 दिवसांपासून सुरु होता जागेचा शोध

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं लोकांनी समर्थन केलं. तर, समाजातील काही विचारवंत, वकील आणि राजकीय नेत्यांना हा एन्काऊंटर फेक असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तर, अक्षयच्या वडिलांनी याप्रकरणी न्यायालयात धावदेखील घेतली. त्यामुळे, अक्षयच्या मृतदेहावरील अंत्यंस्कार हादेखील गुंतागुंतीचा विषय बनला. त्यातच, शिंदे कुटुंबीयांच्या रितीरिवाजानुसार अक्षयचा दफनविधी करण्यास सरकारच्यावतीने कबुली दर्शवण्यात आली होती. त्यामुळे, दफनविधीसाठी जागा शोधण्याचं काम पोलिसांकडून गेल्या 3 दिवसांपासून सुरू होतं, अखेर हा शोध संपला आहे.   

हेही वाचा

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, बैठकीत झाली घोषणा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAkshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफनAkshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफनBalasaheb Thorat : विरोधीपक्ष नेता कुणाला करायचा याची चर्चा सुरु करा; फडणवीसांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Akshy shinde funeral: स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा दफनविधी, कडक पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
Embed widget