एक्स्प्लोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, बैठकीत झाली घोषणा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार

या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.

Beed: दसऱ्यादिवशी मेळावा घेण्याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. त्यात शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा असो की भगवानगडावरील पंकजा मुंडे यांचा मेळावा असो यात आता आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे. ती म्हणजे यावर्षीपासून नारायण गडावर ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून रणशिंग फुंकले असून जरांगेंनी या बैठकीत तशी घोषणा केली. या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज नारायणगडावर पार पडली.  या बैठकीसाठी मराठा कार्यकर्त्यांची मोठी हजेरी होती. या बैठकीमध्ये कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचा गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.

नारायणगडावरून जरांगेंनी फुंकले रणशिंग

राज्यात दसरा मेळाव्याची अनेक ठिकाणी परंपरा आहे. बीडच्या सावरगाव घाट मध्ये पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या  बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे. 

निवडणूकीच्या तोंडावर दुसऱ्या दसरा मेळाव्याची रूपरेषा

मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रात राजकीय घटनांना वेग आलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निवडणूका अवघ्या महिना दीड महिन्याने होण्याची शक्यता असताना मनोज जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केल जाणार आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरवल्याची माहिती आहे. निवडणूकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार आहे.

पुढील लढाई निवडणूकीची

आठवडाभर उपोषण करुनही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले होते. त्यानंतर आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची घोषणा झाल्यानं विधानसभा निवडणूसाठी मनोज जरांगे यांनी रणशिंग फुंकल्याचं दिसतंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
धक्कादायक! बँकेच्या लॉकरमधून 25 तोळं सोनं गायब; महिलेला रडू कोसळले, पोलिसांत धाव
Embed widget