Zomato: झोमॅटो कंपनीत मोठी घडामोड; आणखी एका सहसंस्थापकाने दिला राजीनामा
Gunjan Patidar Co-Founder Zomato Resigned: झोमॅटो कंपनीत आणखी एक मोठी घडामोड झाली आहे झोमॅटोचे सह-संस्थापक गुंजन पाटीदार यांनी राजीनामा दिला आहे.
Gunjan Patidar Co-Founder Zomato Resigned: देशातील सर्वात मोठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी (Online Food Delivery Company) झोमॅटोचे (Zomato Ltd.) सहसंस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार (Gunjan Patidar, Zomato Co-founder and Chief Technology Officer) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. Zomato कंपनीने आज भारतीय शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. गुंजन पाटीदार हे कंपनीसाठी कोअर टेक सिस्टिम तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. कंपनीने त्यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचे कोणतेही कारण दिले नाही. मागील काही महिन्यांपासून झोमॅटो कंपनीत मोठ्या घडामोडी होत आहेत.
झोमॅटोसाठी महत्त्वाचे योगदान
मागील 10 हून अधिक वर्षांपासून गुंजन पाटीदार यांनी कंपनीच्या टेक्निकल टीमचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेली टीम ही इतर तांत्रिक कार्यांशी संबंधित कामाची जबाबदारी घेण्यास सक्षम असल्याचे झोमॅटोने म्हटले. गुंजन पाटीदार यांनी आयआयटी दिल्लीमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या पाटीदार यांनी टेक्निकल कोअर टीमचे नेतृत्व केले होते.
मागील वर्षी मोहित गुप्ता यांचा राजीनामा
मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीचे आणखी एक सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. जवळपास साडे चार वर्षांपूर्वी मोहित गुप्ता यांना फूड डिलिव्हरी बिजनेसच्या सीईओ पदावरून पदोन्नती करून त्यांना कंपनीचे सह-संस्थापक करण्यात आले होते.
मागील काही वर्षात झोमॅटो कंपनीतील अनेक दिग्गजांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये राहुल गंजू (Rahul Ganju), सिद्धार्थ झवर (Siddharth Jhawar, Former Vice President and Head of Intercity), गौरव गुप्ता (Gaurav Gupta, Co-founder) यांचा समावेश आहे.
सप्टेंबर तिमाहीत उत्पन्नात वाढ
झोमॅटोचा निव्वळ तोटा सप्टेंबरच्या तिमाहीत ₹250.8 कोटी इतका झाला. मागील आर्थिक वर्ष 2022 च्या याच तिमाहीत हा तोटा 434.9 कोटी रुपया इतका होता. दरम्यान, महसुलात 62.20 टक्क्यांनी वाढ झाली असून 1,661.3 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सप्टेंबरच्या तिमाहीत, कंपनीच्या अन्न वितरण व्यवसायाची विक्री मागील आर्थिक वर्ष 2021 च्या याच तिमाहीत 5,410 कोटी रुपयांवरून केवळ 22 टक्क्यांनी वाढून 6,631 कोटी रुपये झाली आहे. झोमॅटोचा शेअर सोमवारी बीएसईवर 1.52 टक्क्यांनी वाढून 60.26 रुपयांवर बंद झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: