झोमॅटोचे सीईओ दिपंकर गोयल बनले डिलिव्हरी बॉय, जाणून घ्या नक्की काय झालं
Zomato news : 2022 वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल 31 डिसेंबर रोजी झोमॅटोचे सीईओ दिपंकर गोयल यांनी स्वत: डिलिव्हरी बॉय बनून ग्राहकांच्या ऑर्डर त्यांच्या घरी पोहोचवल्या आहेत.
Zomato news : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे सीईओ दिपंकर गोयल ( zomato CEO Deepinder Goyal ) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावरून ते काही अपडेट देत असतात. परंतु, आता त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण खूपच खास आहे. 2022 वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल 31 डिसेंबर रोजी सीईओ दीपंदर गोयल यांनी स्वत: डिलिव्हरी बॉय बनून ग्राहकांच्या ऑर्डर त्यांच्या घरी पोहोचवल्या आहेत. गोयल यांनी स्वत: च्या ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
31 या वर्षातील शेवटच्या विसाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग तयारी करत असतं. आपली रोजची कामे आटोपून नव्या वर्षासाठी लोक तयारीत असता. याच वेळी झोमॅटोचे सीईओ स्वत:च फूड डिलिव्हरीसाठी ऑफिसमधून बाहेर पडतात आणि सर्वांना आश्चर्यचा धक्का देतात. डिलीव्हरीबॉय बनून बाहेर पडलेल्या गोयल यांना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. परंतु, गोयल ऑर्डर पूर्ण करून परत आले देखील. त्यांच्या ऑफिसमधील लोकांनी देखील गोयल यांचा अनोख अंदाज पाहून आश्चर्य व्यक्त केले. ऑफिसच्या कामातून थोडा वेळ ब्रेक घेऊन गोयल यांनी ही ऑर्डर पूर्ण केली.
गोयल यांनी ट्विटरवरून ऑर्डर पूर्ण केल्याची माहिती दिली. त्यांची पहिली डिलिव्हरी झोमॅटो ऑफिससाठीच होती. त्यांनी तब्बल चार ऑर्डर दिल्याची माहिती त्यांनी दिली. "आत्ता मी स्वतःहून काही ऑर्डर देणार आहे. तासाभरात परत यायला हवे. माझ्या पहिल्या ऑर्डरने मला झोमॅटो ऑफिसमध्ये परत आणले, असे ट्विट त्यांनी केले आहे. झोमॅटो आणि ब्लिंकिटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून स्वतःचे वर्णन करण्यासाठी त्यंनी ट्विटर बायो देखील बदलले.
My first delivery brought me back to the zomato office. Lolwut! https://t.co/zdt32ozWqJ pic.twitter.com/g5Dr8SzVJP
— Deepinder Goyal (@deepigoyal) December 31, 2022
दरम्यान, काही वेळाने त्यांच्या डिलिव्हरीचे अपडेट देत दुसरे ट्विट केले. "माझी पहिली डिलिव्हरी मला झोमॅटोच्या ऑफिसमध्ये परत घेऊन आली, असे सांगत त्यांचा एक फोटोही ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दीपंदर गोयल हे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा ड्रेस घालून हातात काही खाद्यपदार्थांचे डबे दिसत आहेत. याबरोबरच त्यांनी 31 डिसेंबरच्या दिवसात झोमॅटोने 20 लाख डिलिव्हरी आॅर्डर्स पूर्ण केल्याचे ट्विटही त्यांनी केले आहे.