Electric Vehicle : जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार; वाचा किंंमत आणि फीचर्स
Wuling Nano EV कंपनीने IP67 लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी 28kWh आहे. ही छोटी कार एकाच चार्जवर 305 किमी पर्यंत धावू शकते.
Electric Vehicle : चीनची ऑटो कंपनी वूलिंग होंगगुआंगने आपल्या देशांतर्गत बाजारात जगातील सर्वात लहान आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. Nano EV च्या नावाने लाँच झालेल्या या कारची किंमत 20,000 युआन म्हणजेच सुमारे दोन लाख 30 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. 2021 च्या टियांजिन इंटरनॅशनल ऑटो एक्स्पोमध्ये या कारचे प्रथम लॉन्चिंग करण्यात आले. वूलिंग कंपनी गेल्या वर्षीच बाजारात आली आहे आणि येताच त्यांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे.
काय आहेत फीचर्स?
Wuling Nano EV ला EBD, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ABS ब्रेकसह स्पीड अलर्ट सिस्टीम मिळते. तसेच, या छोट्या कारला रिव्हर्सिंग कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, एसी, कीलेस एंट्री सिस्टीम, एलईडी हेडलाइट्स, 7-इंच डिजिटल स्क्रीन आणि टेलीमॅटिक्स सिस्टीम सारखी सुविधा देण्यात आली आहे.
टॉप स्पीड 100 किमी/तास
या छोट्या नॅनो कारमध्ये फक्त दोन सीट देण्यात आल्या आहेत. या कारची लांबी 2,497 मिमी, रुंदी 1,526 मिमी आणि उंची 1,616 मिमी आहे. या व्यतिरिक्त, कारमध्ये 1,600 मिमीचा व्हीलबेस देखील आहे. या कारमध्ये 33 PS इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे, जो जास्तीत जास्त 85 Nm टॉर्क जनरेट करतो. त्याची टॉप स्पीड 100 किमी/तास आहे.
पूर्ण चार्जसाठी किती वेळ लागतो?
Wuling Nano EV कंपनीने IP67 लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी 28kWh आहे. ही छोटी कार एकाच चार्जवर 305 किमी पर्यंत धावू शकते. त्याच वेळी, ही EV कार 220 व्होल्टच्या होम सॉकेटमधून 13.5 तासात पूर्णपणे चार्ज होते. तर 6.6KW AC चार्जरने चार्ज करण्यासाठी 4.5 तास लागतात.