'ही' एक चूक कराल तर होऊ शकतो मोठा तोटा, पोस्ट ऑफिसच्या योजनांचा लाभ घेता येणार नाही!
पोस्ट ऑफिसच्या योजना घेण्यासाठी पॅनवरील माहिती ही योग्य आणि बरोबर असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही.
मुंबई : तुमच्याकडच्या पैशांची गुंतवणूक करून कोणताही धोका न पत्करता तुम्हाला चांगले रिटर्न्स देणाऱ्या अनेक योजना आहेत. यातही पैसे बुडू नयेत म्हणून गुंतवणूकदार सरकारी योजनांनाच प्राधान्य देतात. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्याही अशा अनेक योजना आहेत, ज्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. मात्र अशा प्रकारच्या सर्वच योजनांसाठी काही समान नियम असतात. पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनांसाठी असाच एक नियम आहे. या नियमाअंतर्गत घालून देण्यात आलेल्या अटी पूर्ण न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
पोस्ट ऑफिसच्या योजनांसाठी आधार, पॅनची माहिती देणे अनिवार्य
पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती देणे अनिवार्य असते. पोस्ट ऑफिसने 7 मे रोजी एक सूचना जारी केली होती. या सूचनेनुसार पॅन व्हेरिफिकेशनशी संबंधित Protean सिस्टिमला 1 मे, 2024 रोजी अपडेट करण्यात आले आहे. या सिस्टिमध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आहे. आता पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्याआधी पोस्ट ऑफिस विभाग तुम्ही दिलेल्या पॅन क्रमांकाची माहिती प्राप्तिकर विभागाला विचारणार आहे. तुम्ही दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेतली जाणार आहे. तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे तपासणे हाच यामागचा प्रमुख उद्देश आहे.
पॅनवरील माहिती चुकीची असल्यास येणार अडचण
पोस्ट ऑफिस विभाग प्राप्तिकर विभागाशी संपर्क करून तुम्ही दिलेल्या पॅन कार्डची चौकशी करणार आहे. तुमच्या पॅनकार्डवर नमूद असलेल्या माहितीनुसार तुम्ही जन्मदिन तसेच नावाची माहिती बरोबर न दिल्यास तुम्हाला पोस्टाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. छोट्या बचत योजनांत गुंतवणूक करायची असेल तर आधार कार्ड आणि पॅनकार्ड अनिवार्य
सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही
PPF, NSC किंवा अन्य छोट्या बचत योजनांत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी लिंक झालेली असायला हवीत. पॅनकार्ड हे आधार कार्डशी लिंक नसल्यावर तुम्हाला या योजनांचा फायदा घेता येणार नाही.
पॅन आधार लिंक नसल्यास काय तोटा होणार?
पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक नसतील तर तुम्हाला अनेक तोटे हेऊ शकतात. तुम्हाला शासकीय योजनांचा फायदा घेता येणार नाही. तसेच विमान, म्यूच्यूअल फंड किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला तुमचा टीडीएसदेखील तुमच्या बँक खात्यावर जमा करायला अडचणी येऊ शकतात.
हेही वाचा :
चला चला घाई करा! 'या' चार बँका एफडीवर देतायत भरघोस व्याज, मालामाल होण्याची नामी संधी!
आयटीआर भरण्यासाठी फॉर्म 16 हवाय? चिंता सोडा 'असा' करा डाऊनलोड!