बिझनेसमध्येही विराट-अनुष्क सुस्साट! 4 वर्षांपूर्वी गुंतवले अडीच कोटी, आता मिळवणार थेट तिप्पट रिटर्न्स
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गुंतवणूक केलेली कंपनी आपला आयोपीओ घेऊन येत आहे. या आयपीओमुळे विराट आणि आनुष्का यांनी तिप्पट रिटर्न्स मिळू शकतात.
मुंबई : शेअर बाजारात (Share Market) बक्कल पैसा कमवायचा असेल तर गुंतवणुकीची योग्य वेळ साधावी लागते. ही वेळ साधता आली तर तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळतो. हीच बाब जमीन, घर खरेदी तसेच अन्य गुंतवणुकीत लागू पडते. टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी चार वर्षांपूर्वी अशीच एक गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीतून आज ही जोडी कोट्यवधीचा नफा मिळवणार आहेत.
दोघांनी केली अडीच कोटींची गुंतवणूक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी चार वर्षांपूवी गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक केली होती. हीच कंपनी आता लवकरच शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे. तसे झाल्यास विराट-अनुष्का यांना दुप्पट ते तिप्पट परतावा मिळू शकतो. गो डिजिट जनरल इन्शुरन्स ही कंपनी लवकरच आपला आयपीओ आणत आहे. त्यानंतर ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होईल. सध्या ही कंपनी ज्या भावाने आयपीओ आणत आहे, त्याच्या कितीतरी कमी किमतीत विराट-अनुष्का यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. दोघांनीही या कंपनीत फेब्रुवारी 2020 मध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी 75 रुपयांना एक शेअर या हिशोबाने या कंपनीत गुंतवणूक केली होती. विराटन गो डिजिट कंपनीत 2.66 लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. त्याची किंमत 2 कोटी रुपये होती. तर अनुष्का शर्माने 50 लाख रुपयांत 66667 शेअर्स खरेदी केले होते.
आज मिळू शकतात तब्बल 9 कोटी
विराट आणि अनुष्का या दोघांनीही मिळून एकूण अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार गो डिजिट ही कंपनी येत्या 15 मे रोजी आयपीओ आणणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 258 ते 272 रुपये प्रतिशेअर आहे. म्हणजेच Go Digit IPO च्या किमतीनुसार अनुष्का-विराट यांना चार वर्षांत तब्बल 262 टक्क्यांनी रिटर्न्स मिळणार आहेत.
आयपीओच्या किंमत पट्ट्याच्या हिशोबाने विराटच्या मालकीच्या 2. 66 लाख शेअर्सची किंमत ही 7. 5 कोटी रुपये तर अनुष्का शर्माच्या मालकीच्या 66667 शेअर्सची किंमत ही 1. 81 कोटी रुपये होऊ शकते.
दोघांच्याही शेअर्सचे एकूण मूल्य थेट 9 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. चार वर्षांपूर्वी या दोघांनीही फक्त 2. 5 कोटी रुपये गुंतवले होते. आता याच पैशांचे त्यांना 9 कोटी रुपये मिळू शकतात. गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीने 2651 रुपयांच्या आयपीओसाठीक किंमत पट्टा 258 ते 272 रुपये प्रति शेअर ठेवलेला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
एसआयपी करताना फक्त 'ही' चार सूत्रं पाळा, मालामाल व्हा; मिळवा दुप्पट, चौपट परतावा!
50-30-20 चा नियम आहे तरी काय? पगार संपणार नाही, सेव्हिंगही होणार भरपूर!
चला चला घाई करा! 'या' चार बँका एफडीवर देतायत भरघोस व्याज, मालामाल होण्याची नामी संधी!