'या' पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर, गुंतवणूक केल्यास मिळू शकतो चांगला परतावा!
शुक्रवारी गुंतवणूकदारांनी खालील पेनी स्टॉक्समध्ये पैसे गुंतवले. त्यामुळे आता सोमवारीही हे स्टॉक्स चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : शुक्रवारी शेअर बाजारात (Share Market) चढ-उतार पाहायला मिळाले. शेअर बाजाराचा निर्देशांक खाली येताच काही गुंतवणूकदारांनी हीच चांगली संधी आहे, म्हणत अनेक स्टॉक्स खरेदी केले. तर काही लोकांचे नुकसानही झाले. या स्थितीत मात्र काही पेनी स्टॉक्सने (Penny Stocks) चांगली कामगिरी केली. काही पेनी स्टॉक्स तर असे होते, ज्यांना थेट अपर सर्किट लागलं. दरम्यान, शुक्रवारी चांगली कामगिरी केल्यामुळे हे पेनी स्टॉक्स सोमवारीदेखील चांगली कामगिरी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हे स्टॉक्स कोणते आहेत? ते जाणून घेऊ या...
Ambo Agritec
अँबो अॅग्रिटेक या कंपनीचा स्टॉक शुक्रवारी 36.30 रुपयांवर होता. सोमवारी हा स्टॉक चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
KJMC Financial Services
केजीएमसी फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या स्टॉकमध्ये सोमवारी चांगली तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी या कंपनीचा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढून 68.40 वर बंद झाला. सोमवारीदेखील हा स्टॉक चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Konstelec Engineers
शुक्रवारी भांडवली बाजार चालू असताना लोकांचा या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याकडे कल होता. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 20 टक्क्यांनी वाढून 232. 60 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे सोमवारीदेखील हा स्टॉक चांगली कामगिरी करू शकतो.
Peninsula Land
शुक्रवार या कंपनीच्या स्टॉकमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. हा स्टॉक शुक्रवारी 20 टक्क्यांनी वाढून 58.70 रुपयांवर बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून या स्टॉकमध्य अपट्रेंड चालू आहे. त्यामुळे सोमवारीदेखील या स्टॉकमध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळतेय.
Achyut Healthcare
या कंपनीच्या स्टॉकमध्ये सोमवारी तेजी येऊ शकते. कारण शुक्रवारी हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढला. शुक्रवारी हा स्टॉक 48.25 रुपयांवर बंद झाला. अजूनही लोक हा स्टॉक खरेदी करत आहेत. अशाच प्रकारचा ट्रेंड राहिल्यास हा स्टॉक सोमवारी चांगली कामगिरी करू शकतो.
(टीप-प्राथमिक माहिती देणे हाच या लेखाचा उद्देश आहे. आम्ही कोणाचाही प्रचार, समर्थन वा शिफारस करत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
काहीही केलं तरी सीबील स्कोअर वाढत नाहीये? मग फक्त 'या' तीन गोष्टी करा!
शेतकरी सन्मान निधी योजनेत नाव आहे की नाही, हे कसे शोधावे? जाणून घ्या, नेमकं काय करावं?
'हा' एक इन्शुरन्स काढा, अन् गृहकर्जाची चिंता सोडा, तुमच्या कुटुंबाला EMI भरण्याची गरज पडणार नाही!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
