मंगळवारी शेअर बाजारात काय होणार? कोणते शेअर्स पडणार, कोणत्या शेअर्समध्ये तेजी!
सोमवारी सत्र चालू असताना चढ-उतार पाहायला मिळाले. या सत्रात काही कंपन्यांनी चांगली कामगिरी केली तर काही कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई : मोठ्या चढ-उतारानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजार (Share Market) तेजीसह बंद झाला. जागतिक पातळीवरही शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाल्यामुळे भारतात, वीज निर्मिती, वाहन निर्मिती आदी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांनी विकले. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 131.18 म्हणजेच 0.17 टक्क्यांची तेजी मिळाली. मुंबई शेअर बाजारात सोमवारी दिवसाअखेर 77,341.08 अंकांनी बंद झाला. सोमवारी सत्र बाजार चालू असताना हा निर्देशांक सुरुवातीला 463.96 अंकांनी घसरला होता. नंतर मात्र 213.12 अंकांसह या निर्देशांकांत तेजी आली. राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) अर्थात एनएसईचा निर्देशांक निफ्टीही 36.75 अंकांनी म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 23,537.85 अंकांवर स्थिरावला.
सोमवारी कोणते शेअर्स पडले, कोणत्या शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्सवर असलेल्या 30 आघाडीच्या कंपन्यांत महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, सन फार्मा, नेस्ले, अल्ट्राटेक सीमेंट, एनटीपीसी, आयटीसी, आयसीआईसीआई बँक, टायटन, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक या कंपन्यांचे शेअर्स चांगल्या स्थितीत होते. तर इंडसइंड बँक, अडानी पोर्ट्स, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी पडले.
या शेअर्समध्ये मंदीचे संकेत
सोमवारी अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. तर काही कंपन्यांचे शेअर्स पडले. एमएसीडीने (MACD) CAMS, Emami, M&M, Jubilant Life, Supreme Industries आणि Tata Consumer या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदीचे संकेत दिले आहेत. म्हणजेच आता या शेअर्समध्ये घसरण चालू होण्याची शक्यता आहे.
या शेअर्सची केली जाऊ शकते खरेदी
शेअर बाजारावर काही शेअर्स हे चांगली कामगिरी करत आहेत. यामध्ये Bombay Bumrah, Route Mobile, Astral Ploy Tech, JK Paper, Asahi Ind, JSW Infrastructure आणि Brigade Enterprises या कंपन्यांचा समावेश आहे. या शेअर्सने आपला 52 आठवड्यांतील सर्वोच्च स्तर पार केला आहे. त्यामुळे आता या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
सरकारच्या 'या' तीन कंपन्यात गुंतवणूक करणारे झाले मालामाल, दोन वर्षात तब्बल 1200 टक्क्यांनी रिटर्न्स!
टाटा समुहाच्या 'या' कंपनीने जाहीर केला मोठा लाभांश, गुंतवणूकदार होणार मालामाल!
देशात सुपर रिच टॅक्स लागू करा, गरिबी दूर होणार, तीन चतुर्थांश भारतीयांचे मत!