एक्स्प्लोर

Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण, सात महिन्यांनी गाठला नीचांकी स्तर

Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या दरात आणखी घसरण झाली.

Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज ऐतिहासिक घसरण (Rupee Fall) झाली. रुपयात 90 पैशांची घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने (Fedaral Reserve) व्याज दरात वाढ केल्याची घोषणा केली. त्याच्या परिणामी जागतिक बाजारात डॉलर आणखीच वधारला. आज चलन बाजार बंद झाला तेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत 80.95 रुपयांवर बंद झाला. अमेरिकन डॉलर निर्देशांकाने मागील दोन दशकांचा उच्चांक गाठला. अमेरिकन डॉलरने 111.72 चा स्तर गाठला. 

डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री करण्यात आली असल्याची चर्चा आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बाजारातील घडामोडी पाहता रुपयाच्या घसरणीने भारताला फार चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपयाची घसरण रोखण्यासाठी काही प्रयत्न केले का, याबाबत जाणून घेण्यासाठी रॉयटर्सने ट्रे़डर्ससोबत संपर्क साधला होता. मात्र,  ट्रेडर्सकडून याबाबत काहीही पुष्टी करण्यात आली नाही. रुपयांची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने फारशी आक्रमक पावले उचलली नसतील असा अंदाज काही ट्रेडर्सने व्यक्त केला. 

अमेरिकेतील वाढती महागाई रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हने 75 बीपीएसची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अमेरिकेतील व्याज दरात 0.75 टक्क्यांची वाढ झाली. फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याज दरात वाढ केली आहे. आगामी बैठकांमध्येही व्याज दरात वाढ करण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. वर्ष 2023 पर्यंत व्याज दर हा 4.6 टक्क्यांपर्यंत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक चलनबाजारात डॉलर आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम राहिल्यास भारताचा आयात खर्च आणखी वाढण्याची भीती आहे. इंधन दरावर याचा परिणाम होण्याची भीती असून महागाईचा भडका उडू शकतो. 

शेअर बाजारात घसरण

आज शेअर बाजारातही घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 337 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर,  निफ्टीमध्ये 88 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.57 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,119 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.50 अंकांची घसरण होऊन तो 17,629 अंकांवर स्थिरावला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टच्या निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगणार, भारतातील कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं
मायक्रोसॉफ्टच्या एका निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, भारतात मायक्रोसॉफ्टचे किती कर्मचारी? 
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
Pune MLC Election Result : पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
Embed widget