एक्स्प्लोर

शिक्षण पदवी पास, पगार 50 हजार, जागा 4455, बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, अर्ज भरण्याची अंतिम तारीख किती?

ज्या युवकांना बँकेत नोकरी (Bank Job) करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

Bank Recruitment 2024 : ज्या युवकांना बँकेत नोकरी (Bank Job) करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पदवीचं शिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी ही मोठी संधी आहे. कारण 4455 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली असून, 50 हजार रुपयांचा पराग देखील मिळणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन प्रोबेशनरी ऑफिसरच्या 4455 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आजपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्हाला बँकेत नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. IBPS ने 4455 PO पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही पदे प्रोबेशनरी ऑफिसर्स/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (CRP PO/MT) साठी आहेत. यासाठीचे अर्ज आजपासून म्हणजेच गुरुवार, 1 ऑगस्ट, 2024 पासून सुरु झाले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 

IBPS PO च्या या पदांसाठी अर्ज आजपासून म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज संपादित करण्याची ही शेवटची तारीख आहे. तुमचा अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 आहे. ऑनलाइन फी देखील 1 ते 21 ऑगस्ट दरम्यान जमा करणं गरजेचं आहे.  

20 ते 30 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात

अर्ज फक्त ऑनलाइन केले जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याचा पत्ता हा ibps.in. येथून अर्ज करण्यासोबतच या पदांचा तपशीलही जाणून घेता येईल. पुढील अपडेट्सचीही माहिती मिळू शकेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असणे आवश्यक आहे. 20 ते 30 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी वर्षातून एकदा घेतली जाते. दरवर्षी ४ ते ५ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात.

अर्जाची फी किती? 

अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PH श्रेणीतील उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क आहे.

उमेदवारांची निवड कशी होणार? 

परीक्षांच्या अनेक फेऱ्या पार केल्यानंतर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व प्रथम, पूर्व परीक्षा घेतली जाईल जी एक तासाची असेल. यानंतर मुख्य परीक्षा होईल जी 3 तास 30 मिनिटांची असेल. पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असून हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये परीक्षा घेतली जाते. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला तिन्ही टप्पे पार करावे लागतील.

कोणत्या बँकेत किती जागा?

बँकांमधील अनेक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. बँक ऑफ इंडिया – 885 पदे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 2000 पदे, कॅनरा बँक - 750 पदे, इंडियन ओव्हरसीज बँक - 260 पदे, पंजाब नॅशनल बँक - 200 पदे, पंजाब आणि सिंध बँक - 360 पदे आहेत. 

परीक्षा कधी ?

प्रिलिम्स परीक्षा ही ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. तर मुख्य परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होईल. त्याचा निकाल डिसेंबर 2024 किंवा जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध होईल. जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. निकाल एप्रिल 2025 मध्ये जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान, तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. 

पगार किती?

मूळ वेतन 36,000 रुपये आहे, उर्वरित भत्ते आणि कपातींचा समावेश केल्यानंतर, उमेदवारांना दरमहा सुमारे 52 हजार रुपये वेतन मिळते. इतर भत्तेही दिले जातात. याविषयी किंवा इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी वेबसाइटवर दिलेल्या सूचना तपासा. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget