एक्स्प्लोर

100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट समोर, RBI नं बँकांना दिल्या महत्वाच्या सूचना

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी बँकांना एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा  ठेवण्यास सांगितले आहेत. लोकांना छोट्या व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी RBI बँकांना सूचना दिल्या आहेत.

RBI News :  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी बँकांना एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा  ठेवण्यास सांगितले आहेत. लोकांना छोट्या व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी RBI बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळं ग्राहकांना एटीएममध्ये (ATM) आता 100 आणि 200 रुपयांच्या नोटा देखील मोठ्या प्रमाणात उपल्बध होतील.

दरम्यान, जेव्हा लोक एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी जातात तेव्हा बहुतेकदा असे घडते की लोकांना फक्त 500 रुपयांच्या नोटा काढता येतात. 500 रुपयांच्या नोटा मिळाल्यानंतर अनेकदा लोकांना पैसे सुट्टे करण्यासाठी भटकंती करावी लागते. पण आता लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोमवारी बँकांना एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचे वितरण सुनिश्चित करण्यास सांगितले.

छोट्या व्यवहारात लोकांना कोणतीही अडचण येऊ नये - RBI

लोकांपर्यंत या नोटांची उपलब्धता वाढवण्यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAOs) यांना टप्प्याटप्प्याने या निर्देशाची अंमलबजावणी करावी लागेल. नॉन-बँकिंग संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एटीएमना 'व्हाइट लेबल एटीएम' (WLA) म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, वारंवार वापरल्या जाणाऱ्या मूल्याच्या बँक नोटांपर्यंत सार्वजनिक प्रवेश वाढवण्यासाठी, सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAO) त्यांच्या एटीएममध्ये नियमितपणे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा वितरीत केल्या जातील याची खात्री करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

100, 200 रुपयांच्या नोटांना मोठी मागणी 

परिपत्रकानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, 75 टक्के एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन्स) किमान एका कॅसेटमधून 100 किंवा 200 रुपयांच्या बँक नोटा वितरीत करू शकतील. यानंतर, 31 मार्च 2026 पर्यंत, 90 टक्के एटीएमने किमान एका कॅसेटमधून 100 किंवा 200 रुपयांच्या बँक नोटा वितरित केल्या पाहिजेत. आरबीआयने बँकांना एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यास सांगितले आहे. हा आदेश बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स (WLAO) या दोघांनीही पद्धतशीरपणे लागू करावा लागेल. या आदेशानंतर देशातील बँका आणि अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या आदेशानंतर एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत बँकांना अधिक कसरत करावी लागणार आहे. कधी कधी  एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा  उपबल्ध होत नाहीत. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागl Eus.. 

महत्वाच्या बातम्या:

ATM charge News : 1 मेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार, एकदा पैसे काढल्यास किती चार्ज लागणार?

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget