एक्स्प्लोर

ATM charge News : 1 मेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार, एकदा पैसे काढल्यास किती चार्ज लागणार?

New ATM cash withdrawal Rule 2025: जर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदाच एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण जे तुम्ही वारंवार एटीएममधून पैसे काढत असाल तर त्यावरती वाढीव शुल्क लागणार आहे.

New ATM cash withdrawal Rule 2025: जर तुम्ही देखील वारंवार ATM मधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 मे 2025 पासून, मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. याचा अर्थ एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी पैसे काढता तेव्हा तुमच्या खिशावर थोडा जास्त भार पडेल. 

एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क किती वाढलं?

आतापर्यंत, मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जात होते. परंतु 1 मे 2025 पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळी 2 रुपये जास्त द्यावे लागतील. जे लोक महिन्यातून अनेक वेळा पैसे काढण्यासाठी एटीएम वापरतात त्यांच्यासाठी हा खर्च वाढेल.

मोफत व्यवहार मर्यादा जैसे थे

मोफत मर्यादेबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा की ग्राहक अजूनही दरमहा त्यांच्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा मोफत व्यवहार करू शकतात. याशिवाय, इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून 3 वेळा मोफत व्यवहारांची सुविधा मेट्रो शहरांमध्ये आणि 5 वेळा मोफत व्यवहारांची सुविधा नॉन-मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळेला पैसे काढले तरच नवीन शुल्क लागू होईल.

लहान बँकांच्या ग्राहकांवर जास्त परिणाम 

एटीएम शुल्कात वाढ झाल्याने सर्वात जास्त परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवर होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. लहान बँकांकडे कमी एटीएम असतात आणि ते मोठ्या बँकांच्या नेटवर्कवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, जर मोफत व्यवहाराची मर्यादा संपली तर या ग्राहकांना प्रत्येक वेळी जास्त पैसे द्यावे लागू शकतात. अशा परिस्थितीत, जास्त शुल्क टाळण्यासाठी, काही ग्राहक त्यांची बँक बदलण्याचा विचार करू शकतात जेणेकरून ते अधिक वारंवार मोफत व्यवहारांची सुविधा मिळवू शकतील.

एटीएम शुल्क वाढवण्याचे कारण काय?

बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर (जसे की व्हाईट-लेबल एटीएम कंपन्या) बऱ्याच काळापासून शुल्क वाढवण्याची मागणी करत होते. त्यांनी एटीएम चालवण्याचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि त्यांना तोटा होत आहे असे सांगितले होते. यावर, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आरबीआयला शुल्क वाढवण्याची शिफारस केली होती, ती आता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे हा नवीन नियम 1 मे 2025 पासून लागू होईल.

अतिरीक्त पैसे देणं कसं टाळता येऊ शकतं?

जर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदाच एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण जे लोक एटीएममधून वारंवार पैसे काढतात त्यांच्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स आहेत.
- फक्त मोफत मर्यादेत व्यवहार करा.
- तुमच्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर करा.
- रोख रकमेची गरज कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट, यूपीआय किंवा मोबाईल वॉलेटसारखे पर्याय अधिक वापरा.
अशाप्रकारे, तुम्ही नवीन वाढलेले शुल्क सहजपणे टाळू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
बँकेत नोकरीची मोठी संधी! 11 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, पगार मिळणार 64 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
Tamil Nadu : सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी मिळणार, जोसेफ विजय सरकारनं 1 लाख 28 हजार अंगठ्यांची ऑर्डर दिली
जोसेफ विजय सरकारचा मोठा निर्णय, सरकारी रुग्णालयात जन्म झालेल्या बालकांना सोन्याची अंगठी देणार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget