(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2000 Rupees Note Exchange: नोटा बदलण्याची अंतिम मुदत संपली! आता पुढं काय? 'हे' आहेत मार्ग
2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची अंतिम मुंदत संपली आहे. मात्र, आता ज्यांच्याकजे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांच्यासाठी पुढं काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्यांच्यासाठी काही मार्ग आहेत.
RBI 2000 Rupees Note Exchange: भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून (2000 Rupees Note Exchange) घेण्याची किंवा जमा करण्याची अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. ही अंतिम मुदत देखील आता संपली आहे. त्यामुळं आता ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांच्यासाठी आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला असेल. तर त्यांच्यासाठी देखील काही मार्ग आहेत.
2000 रुपयांच्या नोटा कुठे जमा कराल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार आजपासून कोणतीही बँक 2000 रुपयांचे चलन स्वीकारणार नाही. मात्र, त्यानंतरही या नोटा कायदेशीर राहतील. अशा परिस्थितीत तुमच्याकडेही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर मुदत संपल्यानंतरही तुम्ही त्या बदलून जमा करू शकता. दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला RBI च्या 19 क्षेत्रीय कार्यालयांपैकी एका कार्यालयात जावे लागणार आहे. तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकता किंवा तुमच्या बँक खात्यात जमा करु शकता. याशिवाय, तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे RBI कार्यालयात 2000 रुपयांची नोट देखील पाठवू शकता.
कोणाला दंड होईल का?
तुम्ही अद्याप 2,000 रुपये बदलले नसल्यास, आता तुम्ही RBI च्या 19 कार्यालयांपैकी कोणत्याही एका कार्यालयात जाऊ शकता किंवा पोस्ट ऑफिसद्वारे पाठवू शकता. 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी RBI कोणतेही शुल्क आकारणार नाही.
RBI ची 19 प्रादेशिक कार्यालये
देशात RBI ची 19 प्रादेशिक कार्यालये आहेत. या कार्यालयामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा तुम्ही जमा करु शकतात. RBI ची 19 प्रादेशिक कार्यालये ही अहमदाबाद, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश आहे. आरबीआयनुसार, कोणतीही संस्था किंवा व्यक्ती 20,000 रुपयांपर्यंतच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलता येऊ शकतात. इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात आल्यावर, RBI नं 2018-19 या वर्षांपासून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली. त्यानंतर, 19 मे 2023 रोजी, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत ही मोठी नोट चलनातून बाहेर काढण्याची घोषणा करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या: