एक्स्प्लोर

Rule Change : रेल्वे तिकीट, एलपीजी, UPI ते सिम नियमांपर्यंत... 1 मार्चपासून बदलणार 'हे' नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Rule Change : दर महिन्याप्रमाणे यंदाच्या महिन्यातही अनेक आर्थिक बदल होत आहेत, ज्याचा तुमच्या मासिक खर्चावर परिणाम होऊ शकतो.

Rule Change : दर महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही आर्थिक बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर होतो. मार्च 2026 पासूनही एलपीजी गॅस, रेल्वे तिकीट, सिम नियम, UPI व्यवहार आणि बँक खात्यातील किमान शिल्लक यांसारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करू शकतात.

LPG Gas Price: एलपीजी गॅस सिलेंडरचे दर

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता असते. मागील काही महिन्यांपासून प्रामुख्याने 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी सुमारे 49 रुपयांनी दरवाढ केली होती. मार्चमध्येही दरात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र सध्या स्थिर आहेत.

Railway Ticket Booking: रेल्वे तिकीट बुकिंग नियमात बदल

1 मार्च 2026 पासून जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगसंदर्भातील नियम बदलणार आहेत. भारतीय रेल्वेचा जुना UTS अॅप बंद केला जाऊ शकतो. त्याऐवजी ‘RailOne’ नावाचे नवीन अॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. या अॅपवर जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि स्थानिक प्रवासाशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध असतील.

SIM Binding: सिम बाइंडिंगचा नवा नियम

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकार 1 मार्चपासून सिम बाइंडिंगचा नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार WhatsApp, Telegram आणि Signal सारखी अॅप्स थेट मोबाईल सिमशी जोडली जातील. जर मोबाईलमधून सिम काढले तर ही अॅप्स तात्काळ बंद पडतील. वाय-फाय किंवा अन्य नेटवर्कद्वारेही सिमशिवाय ही अॅप्स वापरता येणार नाहीत.

UPI : यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित

1 मार्चपासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू केले जाणार आहेत. केवळ UPI PIN पुरेसा नसेल, तर उच्च मूल्याच्या व्यवहारांसाठी बायोमेट्रिक किंवा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य होऊ शकते.

Bank : किमान शिल्लक नियमात बदल

देशातील मोठ्या सरकारी बँका 1 मार्च 2026 पासून किमान शिल्लक (Minimum Balance) नियमात बदल करणार आहेत. पूर्वी एखाद्या दिवशी खात्यात शिल्लक कमी असल्यास दंड आकारला जात होता. आता मात्र सरासरी मासिक शिल्लक (Average Monthly Balance) यावर आधारित दंड आकारला जाईल.

CNG, PNG आणि ATF दरात बदल शक्य

पेट्रोलियम वितरक कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी CNG, PNG आणि विमान इंधन (ATF) दरात बदल करतात. 1 मार्चपासून या दरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Bank Holiday In March: होळी, गुढीपाडवापासून रमजान, राम नवमीपर्यंत...; मार्च महिन्यात 11 दिवस बँकांचे कामकाज बंद, जाणून घ्या, A टू Z माहिती

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget