PVR-INOX Merger : मल्टीप्लेक्स उद्योगात मोठा बदल, PVR आणि INOX ने केली विलीनीकरणाची घोषणा
PVR-INOX Merger : पीव्हीआर आणि आयनॉक्स या दोन कंपन्यांनी रविवारी विलीनीकरणाची घोषणा केली आहे.
PVR-INOX Merger : मल्टिप्लेक्स उद्योगात एक मोठा बदल होणार आहे. पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) या दोन कंपन्यांनी रविवारी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या बोर्डातील सदस्यांची रविवारी बैठक झाली. यामध्ये विलीनीकरणाच्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नवीन कंपनीचे अध्यक्ष पीव्हीआरचे संस्थापक अजय बिजली असणार आहेत.
पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्सच्या (INOX) नव्या कंपनीचे संपूर्ण भारतात 1,500 पेक्षा जास्त स्क्रीन असणार आहेत. करारानुसार, अजय बिजली यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तर संजीव कुमार कार्यकारी संचालक असणार आहेत.
पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड असे विलीनीकरणानंतरच्या कंपनीचे नाव असणार आहे. त्यामुळे विलीनीकरणानंतर उघडणाऱ्या नवीन सिनेमागृहांचे नाव PVR INOX असे असणार आहे. विलीनीकरणामुळे 'पीव्हीआर आयनॉक्स' ही देशातील सर्वात मोठी चित्रपट प्रदर्शनाची कंपनी बनेल.
गुंतवणूकदारांना कसा फायदा होणार?
ज्यांच्याकडे आयनॉक्सचे 10 शेअर्स असतील त्यांना पीव्हीआरचे 3 शेअर्स मिळणार आहेत. म्हणजेच आयनॉक्सचे 470 रुपयांचे एकूण 10 शेअर्स असणार आहेत. त्यांना पीव्हीआरचे 3 शेअर्स मिळाल्याने त्या गुंतवणूकदारांना थेट 1,500 रुपयांचा फायदा होऊ शकतो. तसेच उद्या शेअर बाजार उघडल्यानंतर आयनॉक्ससह पीव्हीआरच्या शेअरची किंमतदेखल वाढण्याची शक्यता आहे.
PVR and INOX announce their merger. pic.twitter.com/Z24VZogJi8
— ANI (@ANI) March 27, 2022
विलीनीकरणाचा निर्णय का घेतला?
कोरोना महामारीमुळे या दोन्ही कंपन्यानी विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाकाळात या दोन्ही कंपन्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. दुसरीकडे, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म स्पर्धेत उतरले आहेत. यासगळ्याचा PVR-INOXला चांगलाच फटका बसत होते. त्यामुळेच या कंपन्यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या
Rule Change: एक एप्रिलपासून बदलणार हे 10 मोठे नियम, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान
EPFO : पीएफ खातेधारकांनी लवकरात लवकर करुन घ्या ई-नॉमिनेशन, मिळतील 'हे' जबरदस्त फायदे
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; 6 दिवसांतील पाचवी वाढ, पेट्रोल 52 तर डिझेल 57 पैशांनी कडाडलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha