एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं; 6 दिवसांतील पाचवी वाढ, पेट्रोल 52 तर डिझेल 57 पैशांनी कडाडलं

Petrol Diesel Price Hike : इंधन दरात मागील 6 दिवसांत पाचवी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल 52 तर डिझेल 57 पैशांनी महागलं आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत.

Petrol-Diesel Price Today 27 March 2022 : आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, डिझेल पुन्हा एकदा 57 पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोलमध्ये प्रति लिटर 52 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत. 

रविवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. रविवारी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागलं होतं. तर त्यापूर्वी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली होती. 

जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते संकेत खरे ठरले आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 82 तर डिझेल 81 प्रति लिटरने वधारणार आहे.  

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढण्याचा अंदाज आहे. युक्रेन-रशिया युद्ध लांबण्याच्या संकेतामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. युरोपीयन संघातील काही देश रशियावरील तेलावर निर्बंध आणण्याची शक्यता असल्यानं तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंची नाराजी दूर ? मावळ मतदार संघात डोकेदुखीArchana Patil Chakurkar : डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपाच्या वाटेवरPraful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीटABP Majha Headlines :  8 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Embed widget