Twitter ब्लू टिक भारतात कितीला पडणार? इलॉन मस्कचं नेमकं गणित काय?
Twitter Blue Tick : ब्लू टिकसाठी भारतीयांना किती रुपये मोजावे लागतील? काय आहे परचेजिंग पॉवर पॅरिटी?
Twitter Blue Tick : प्रसिद्ध उद्योगपती आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक नोव्हेंबर रोजी ब्लू टिकसाठी (Twitter Blue Tick) पैसे आकारण्यात येणार असल्याच्या माहितीचं ट्वीट करत सर्वांनाच धक्का दिला. ब्लू टिकसाठी प्रत्येकाला प्रति महिना आठ डॉलर रुपयांचं (भारतीय किंमतीनुसार 660 रुपये) शुल्क भरावं लागणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं. प्रत्येक देशाच्या क्षमतेनुसार ब्लू टिकच्या किंमती कमी जास्त असेल असं मस्क यांनी सांगितलं. मस्क यांच्या ट्विटनंतर सर्वांनीच याचं कॅलक्युलेशन सुरु केलं होतं. पण थोड्यावेळातच मस्क यांनी आणखी एक ट्वीट करत सांगितलं की, देशाच्या विशेष परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार (Purchasing Power Parity) आठ डॉलरची किंमत अॅडजस्ट केली जाईल. पण परचेजिंग पॉवर पॅरिटी नेमकी काय आहे? त्या हिशोबानं भारतीयांना ब्लू टिकसाठी किती किंमत मोजावी लागेल? पाहूयात सविस्तर माहिती...
काय आहे परचेजिंग पॉवर पॅरिटी? (Purchasing Power Parity)
ओईसीडीनुसार (Organisation for Economic Co-operation and Development) परचेजिंग पॉवर पॅरिटी करेन्सी कन्वर्जनप्रमाणे दर ठरवला जातो. याद्वारे वेगवेगळ्या चलनांची खरेदी एकसमान केली जाते. या कन्वर्जनमध्ये वेगवेगळ्या देशांची किंमतीमधील फरकाला सामाविष्ट केले जात नाही.
म्हणजेच परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार 1 डॉलरचं मूल्य 82.88 रुपये होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार (IMF) के अनुसार, परचेजिंग पावर पॅरिटी असा दर आहे जो एका देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनात रूपांतरित करून समान प्रमाणात वस्तू आणि सेवा खरेदी करता येऊ शकतात.
भारताची परचेजिंग पॉवर पैरिटी किती आहे?
जागतिक बँकेच्या (World Bank) आकडेवारीनुसार 2021 मध्ये भारताची परचेजिंग पॉवर पॅरिटी कन्वर्जन (PPP Conversion) फॅक्टर 23.14 इतका आहे. म्हणजेच भारताची लोकल करेन्सी यूनिट (LCU) प्रति डॉलरच्या तुलनेत 23.14 इतके आहे. सरळ शब्दात सांगायचं झालं तर अमेरिकेत एक डॉलरमध्ये खरेदी करत असलेली वस्तू परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार तुम्ही 23.14 रुपयात खरेदी करु शकता. या पद्धतीनं भारताच्या परचेजिंग पॉवर पॅरिटीनुसार ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 8 डॉलरचे 660 रुपये होत नाही. ब्लू टिकसाठी भारतीयांना 185 रुपये मोजावे लागतील.
इतर देशांची परचेजिंग पॉवर पॅरिटी किती? (LCU per International Dollar)
World Bank च्या आकडेवारीनुसार परचेजिंग पॉवर पॅरिटी प्रति आंतरराष्ट्रीय डॉलर वेगवेगळ्या देशांच्या स्थानिक मुद्रानुसार वेगवेगळी आहे. साऊदी अरबसाठी 1.78, कतारसाठी 2.38, यूक्रेनसाठी 9.28, जोर्डनसाठी 0.29, इंडोनेशियासाठी 4,758.70, आयरलँडसाठी 0.79, तंजानियासाठी 890.58, ऑस्ट्रियासाठी 0.77, चीनसाठी 4.19, नेपाळसाठी 33.83 आणि पाकिस्तानसाठी 41.92 इतका आहे.